आरोग्यसेवेत दाखल होणार २५ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:48+5:302021-09-06T04:33:48+5:30
गोंदिया जिल्हा दुर्गम, आदिवासी, जंगल व्याप्त म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत आरोग्याच्या भौतिक सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. कोरोना ...
गोंदिया जिल्हा दुर्गम, आदिवासी, जंगल व्याप्त म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत आरोग्याच्या भौतिक सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. कोरोना संसर्ग काळात भौतिक सोयी, सुविधांअभावी रुग्णांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पहावयास मिळाले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांचा जीवही जातो. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ व सबळ व्हावी या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. यात जिल्ह्याला सर्वाधिक २५, भंडारा ८, गडचिरोली १२, चंद्रपूर २०, अकोला २, अमरावती ४, बुलढाणा २१, वर्धा व वाशिम जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३ अशा विदर्भातील १० जिल्ह्यांत ८८ रुग्णवाहिका दाखल होणार आहेत.
....................
या आरोग्य केंद्रांना मिळणार रुग्णवाहिका
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत दाखल होणाऱ्या रुग्णवाहिका या गोंदिया तालुक्यातील भानपूर, दवनिवाडा, एकोडी, खमारी, मोरवाही, सालेकसा तालुक्यांतील बिजेपार, दरेकसा, कावराबांध, सातगाव, आमगाव तालुक्यांतील बनगाव, अर्जुनी मोर तालुक्यातील चान्ना बाक्टी, गोठणगाव, केशोरी, कोरंभीटोला, धाबेपवनी, देवरी तालुक्यातील फुटाणा, घाेनाडी, ककोडी, गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, सोनी, तिल्ली-मोहगाव, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा, पांढरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिरोडा तालुक्यातील एकाही आरोग्य केंद्राचा यात समावेश नाही.
..........
रुग्णवाहिका १०२ सेवेसाठी
आरोग्य विभागाची १०२ क्रमांकाची सेवा गरोदर, प्रसूती माता, नवजात शिशू यांच्यासाठी कार्यरत आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होते. जिल्ह्याला मिळणाऱ्या २५ रुग्णवाहिका या १०२ क्रमांकाच्या आरोग्यसेवेत दाखल होणार आहेत.
.....