देवरी तालुक्यासाठी २५ लाखांचा निधी

By admin | Published: April 13, 2016 01:58 AM2016-04-13T01:58:27+5:302016-04-13T01:58:27+5:30

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकांच्या समस्या लक्षात घेवून विकासाची तळमळ ठेवून कार्य करणारे माजी केंद्रीय मंत्री ....

25 lakhs fund for Deori taluka | देवरी तालुक्यासाठी २५ लाखांचा निधी

देवरी तालुक्यासाठी २५ लाखांचा निधी

Next

पटेल यांचा पुढाकार : तालुक्यात स्वागत
देवरी : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकांच्या समस्या लक्षात घेवून विकासाची तळमळ ठेवून कार्य करणारे माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी आदिवासी व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील विविध गावांमधील विकासकामांसाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर केला. त्याबद्दल तालुक्यातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
मंजूर केलेल्या निधीत देवरी नगरातील वार्ड-१ मधील तवाडे यांच्या घरापासून रामप्रसाद अग्रवाल यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या खडीकरणासाठी तीन लाख, वार्ड-३ मध्ये राजकुमार शाहू यांच्या घरापासून तर अशोक जैन यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी तीन लाख रूपये, वार्ड-६ मध्ये गोवारी शहीद स्मारक ते पंचशील समाज मंदिरजवळील शाहू किराणा स्टोर्सपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी तीन लाख रूपये, वार्ड-७ मधील पांडे यांच्या घरापासून ते बँक आॅफ महाराष्ट्रपर्यंत सिमेंट काँक्रिट नाली आरसीसी कव्हरसोबत तीन लाख रूपये, वार्ड-७ मधील एरिकेशन कॉलनीपासून नान्हे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरणासाठी तीन लाख रूपये व वार्ड-८ मध्ये बेनिराम वाघमारे यांच्या घरापासून तर देवानंद शहारे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरणासाठी तीन लाख रूपये असे एकूण १८ लाख रूपयांचा खर्च येणार आहे.
त्याचप्रमाणे फुटाणा, मंगेझरी व कन्हाळगाव या ठिकाणी सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाकरिता प्रत्येकी दोन लाख आणि मुरदोली गावाकरिता सीडी वर्क बांधकामासाठी एक लाख रूपये असे एकूण २५ लाख रूपये विविध कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेशकुमार जैन, आदिवासी नेते रमेश ताराम, देवरीचे नगराध्यक्ष सुमन बिसेन, सेवादलाचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, पंचायत समितीचे सदस्य अर्चना ताराम, बंटी भाटिया, गोपाल तिवारी, नगरसेवक नेमिचंद आंबीलकर, अन्नू शेख, रितेश अग्रवाल, नगरसेविका माया निर्वाण, दविंदर कौर भाटिया यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे आभार व्यक्त केले.

Web Title: 25 lakhs fund for Deori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.