२५ नवीन विंधन विहिरींना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:22 PM2019-05-05T21:22:20+5:302019-05-05T21:22:54+5:30
टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यांतर्गत, आमगाव तालुक्यातील ग्राम टेकरी येथे चुन्नीलाल टेकाम यांच्या घराजवळ, ग्राम बुराडीटोला येथे ब्रिजलाल कटरे यांच्या घराजवळ, ग्राम डोंगरगाव येथे ईश्वर चौरे यांच्या घराजवळ, ग्राम जवरी (शिवनटोला) रु द्रसेन बंसोड यांच्या घराजवळ, ग्राम शिवणी येथे भाऊदास भिवगडे यांच्या घराजवळ, ग्राम खुर्शीपारटोला येथे कुवरलाल उईके व रमेश इनवाते यांच्या घराजवळ, ग्राम ठाणा येथे प्रदीप माटी यांच्या घराजवळ, ग्राम आसोली येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, ग्राम जांभुळटोला जिरन मेश्राम यांच्या घराजवळ, ग्राम तिगाव येथे श्यामशंकर बोपचे यांच्या घराजवळ, ग्राम बघेडा येथे भारत ठाकरे यांच्या घराजवळ, ग्राम वडद येथे पुरणलाल पटले यांच्या घराजवळ, ग्राम सोनेखारी येथे विनोद पटले यांच्या घराजवळ, ग्राम पाऊलदौना येथे हरिचंद अडमे यांच्या घराजवळ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मोरगाव-अर्जुनी येथे गोरख लाडे यांच्या घराजवळ, ग्राम सावरी येथे जगन राऊत यांच्या घराजवळ, ग्राम खामखुर्रा येथे अनंतकुमार राऊत यांच्या घराजवळ, ग्राम झाशीनगर येथे दिलीप कोरेटी यांच्या
घराजवळ तर देवरी तालुक्यातील पिपरखारी (इंदिरानगर) येथे मैथली मडावी यांच्या घराजवळ, ग्राम आमगाव येथे शालिकराम भोयर यांच्या घराजवळ, ग्राम मांगोटोला येथे उमरोनी नेताम यांच्या घराजवळ, ग्राम महाका (उचेपुर) येथे
बघुतराम मुलेटी यांच्या घराजवळ, ग्राम जेठभावडा येथे प्रिया राऊत यांच्या घराजवळ तर ग्राम बोरगाव (शिलापूर) येथे नळ योजना विहिरीजवळ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यासाठी २७ लाख २० हजार ३०० रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.