२५ टक्के शेतकऱ्यांचीही कर्जमाफी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:30 PM2018-08-13T21:30:41+5:302018-08-13T21:31:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी, मराठा, धनगर तर कधी दूध व भाजीपाला उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. त्यात आता शासकी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद करून शासनाला ठप्प केले आहे. बरोजगारीने वाढत असून जीएसटीने आर्थिक मंदी सकंट ओढावले आहे. एवढ्यावरही शेतकरी हिताच्या गोष्टी करणाऱ्या भाजपराजमध्ये १० हजार रूपयांची अतिरीक्त कर्जाची मदत मिळालेली नाही. हेच काय, थकीत शेतकºयांमधील २५ टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजीत विशेष सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप सरकार चतुराई व कुटनितीने काम करीत आहे. जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० रूपये तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी १३५०० रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. अशातच गोंदियातील काही उत्साही नेत्यांनी मोठमोठे होर्डींगही लावले. मात्र जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याला १३५०० रूपयांची मदत मिळाली नसल्याचे सांगीतले. त्यामुळे आता राहूल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी ‘शक्ती अॅप’शी जुळा असेही सांगीतले.
सभेला माजी मंत्री भरत बहेकार, महासचिव राजेश नंदागवळी, अमर वºहाडे, सहेसराम कोरोटे यांनी, पक्षाने केलेली लोकहिताची कामे घरोघरी पोहचवून कॉंग्रेसच्या ‘शक्ती अॅप’ सोबत जिल्ह्यातील प्रत्येकी कॉँग्रेसीला जोडावे असे मत व्यक्त केले. सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, लोकसभा युवक कॉँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, माजी आमदार रामरतन राऊत, उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अॅड,के.आर.शेंडे, पी.जी.कटरे, राकेश ठाकूर, माधुरी हरिणखेडे, पौर्णिमा शहारे, सीमा कटरे, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.