जिल्हा मध्यवर्ती बँकेत २५.४३ कोटींच्या जुन्या नोटा
By admin | Published: June 22, 2017 12:07 AM2017-06-22T00:07:45+5:302017-06-22T00:07:45+5:30
नक्षलवाद, आंतकवाद व भ्रष्ट्राचारावर लगाम लावण्याच्या नावावर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलवाद, आंतकवाद व भ्रष्ट्राचारावर लगाम लावण्याच्या नावावर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. ह्या नोटबंदीला नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या २५ कोटी ४३ लाखाच्या नोटा अजूनही या बँकेकडे पडूनच आहेत.
८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० व १००० च्या जून्या नोटांना बंद केल्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. या नोटबंदीला नऊ महिन्याचा काळ झाला असला तरी आताही बँकाच्या आर्थिक व्यवहारात सुधार आला नाही. गोंदिया जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बँकेकडे २५ कोटी ४३ लाख ४८ हजार ५०० रूपये जमा आहेत.
यात ५०० रूपयाचे ३ लाख ५६ हजार २९३ नोट म्हणजेच १७ कोटी ८१ लाख ४६ हजार ५०० रूपये तर १००० च्या ७६ हजार २०२ नोट म्हणजेच सात कोटी ६२ लाख २ हजार रूपयाचे नोट आहेत. या नोटांना आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे मागविले नाही. नोटबंदी झाल्यानंतर चार दिवस जिल्हा मध्यवर्ती बँकाकडे मोठ्या प्रमाणात नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकात नोटा बदलल्या जाऊ शकतात असा संशय आल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये नोटा स्वीकारू नका असे आदेश देण्यात आले. त्यानंतर पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकाना सदर नोटा घेण्याची परवनागी देण्यात आली. परंतु घेतलेल्या या नोटा अद्याप रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे मागविल्या नाही.
नोटबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला, समान्यांना खस्त्या खाव्या लागल्या. अनेकांचे बळी गेले. परंतु नोटबंदी ज्या उद्देशातून करण्यात आली तो उद्देश शंभर टक्के साध्य झाला नाही. समाजकंटकांचे व भ्रष्ट्राचाऱ्यांचे पैसे बदलण्याचे अनेक पर्याय सरकारने खुले करून ठेवले होते. त्या पर्यायाचा वापर करून पैसे बदलण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचे खाते ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते त्या बँकावर कधी बंंदी कधी सुरू ठेवून हवी असलेली रक्कम शेतकऱ्यांना बदलवित आली नाही. आता जिल्ह मध्यवर्ती बँकेकडे असलेले पैसे रिझर्व्ह बँकेने स्वीकारले नाही. त्यामुळे ही रक्कम पडून आहे. नवऱ्याच्या भितीपोटी अनेक महिलांनी जून्या नोटा दाबून ठेवल्या होत्या.