२६ जनावरं! झाली सुटका, कत्तलखान्यात नेताना पोलिसांची कारवाई
By नरेश रहिले | Published: October 6, 2023 04:34 PM2023-10-06T16:34:05+5:302023-10-06T16:34:38+5:30
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
गोंदिया : देवरी तालुक्याच्या पितांबरटोला फाट्याजवळ कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचा वाहन ५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:४५ वाजता पकडण्यात आला.
छत्तीसगडच्या आजाद चौक खुर्शीपार राजनांदगाव येथील मनोजकुमार उबारणदास सोनवाणी (२७) या तरुणाने वाहन क्रमांक सी.जी. ०७ सी.ई ८७७६ या वाहनात २६ जनावरे डांबून वाहतुक वाहतूक करीत असताना ते जनावरे पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या जनावरांची किंमत १ लाख ८२ हजार तर वाहनाची किंमत १२ लाख असा एकूण १३ लाख ८२ हजाराचा माल जप्त करण्यात आला. या घटने संदर्भात पोलीस शिपाई विशाल खांडेकर यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) सहकलम ५ (ए), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक बोपचे करीत आहेत.