जिल्ह्यात आता २६ तीर्थस्थळ
By admin | Published: February 10, 2017 01:19 AM2017-02-10T01:19:51+5:302017-02-10T01:19:51+5:30
जिल्ह्यातील तिर्थस्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी ६२ लाख ३४ हजार रूपये यंदा दिले.
दोन नवीन स्थळांना मंजुरी : विविध कामांसाठी यंत्रणांना १.७२ कोटी
गोंदिया : जिल्ह्यातील तिर्थस्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी ६२ लाख ३४ हजार रूपये यंदा दिले. चालू वर्षात शिल्लक निधीच्या दिडपट म्हणजे २ कोटी ४३ लाख ५१ हजार रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. परंतु त्यापैकी एक कोटी ७२ लाख ४० हजार रूपये काम करणाऱ्या यंत्रणेला देण्यात आले.
प्राप्त झालेल्या या निधीला कामकाजासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जि.प.गोंदियाला देण्यात आले. या कामातून देवरीच्या धुकेश्वरी मंदिरात आरओ प्लांटसाठी १० लाख, वांढरा येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, आमगावच्या सेमोदेमो येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, ननसरी येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, आमगाव खुर्दच्या गडमाता येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, शिवमंदिर तिरखेडी येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, अर्धनारेश्वर हलबीटोला येथे ५०० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण २ लाख ९० हजारातून, सालेकसा तालुक्याच्या नदीघाट देवरी येथे १० लाखातून सौंदर्यीकरण, १० लाखातून सिमेंट रस्ता, तिरखेडी पोंगेझरा येथे १० लाखातून रस्ता बांधकाम, अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथील भक्तनिवास १० लाखातून, नागरा येथील रस्ता १० लाखातून नागराच्या शिवमंदिरातील पेवींग ब्लॉकचे बांधकाम ३ लाखातून, नागरा सिमेंट रस्ता ३ लाख, कोरणी येथील विद्युतीककरणासाठी एक लाख, भक्तनिवास सभागृह आणि गौशालात विद्युतीककरणासाठी एक लाख, विठ्ठल रूक्मीणी मंदिराच्या मागील भागात विद्युतीकरणासाठी एक लाख, सुकडी येथील चक्रधर मंदिर ते समाज मंदिरापर्यंतच्या सिमेंट रस्त्यासाठी ३ लाख, मोठा मंदिर ते समाज मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठी ३ लाख रूपये, आमगावच्या महादेव पहाडीच्य सिमेंट रस्ता, सौंदर्यीकरणासाठी १० लाख रूपये दिले आहेत.
हे आहेत २६ धार्मिक तीर्थस्थळ
ग्गोंदिया तालुक्यात शिवमंदिर नागरा,केळझरा,कोरणी, लहरीबाबा आश्रम कामठा, फुलचूर येथील शिवधाम, आमगाव तालुक्यात महादेव पहाडी, समोदेमो देवस्थान, महाकाली मंदिर, ननसरी, गोरेगाव तालुक्यात मांडोदेवी, पोंगेझरा हिरडामाली, बह्याबाबा मंदिरकवलेवाडा, डोंगरूटोला येथील श्री प्रभूदत्त देवस्थान, सालेकसा तालुक्यात कचारगड देवस्थान, अर्धनारेश्वर हलबीटोला, शिवमंदिर तिरखेडी, गडमाता मंदिर आमगाव खुर्द, नदीघाट देवागीरी साकरीटोला, शिवमंदिर कोटरा, तिरोडा तालुक्यात सुकडी/डाकराम, संत विश्रामबाबाा मठ सालेकसा, बौध्द विहार तिरोडा, प्रतापगड ृिवमंदिर व मस्जीत, बोंडगावदेवी, देवरी तालुक्यातील धुकेश्वरी, वांढरा या तीर्थस्थळांचा समावेश आहे.