२७ युवकांनी केले रक्तदान
By admin | Published: July 1, 2017 12:22 AM2017-07-01T00:22:22+5:302017-07-01T00:22:22+5:30
निमगाव येथील विविध जाती धर्माचे समविचारी युवक एकत्र आले व गावामध्ये शांतता प्रस्तापित करुन सुबत्ता नांदावी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : निमगाव येथील विविध जाती धर्माचे समविचारी युवक एकत्र आले व गावामध्ये शांतता प्रस्तापित करुन सुबत्ता नांदावी या सामाजिक दायित्वाच्या कल्पनेतून ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. यातच ‘दानात दान, रक्तदान’ याचे स्मरण करुन ग्रामरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले.
त्या शिबिरात नितेश निनावे, लोमेश गहाणे, संदीप कापगते, दुष्यंत बनपूरकर, मंगेश बारई, जयपाल रुखमोडे, डॉ. अमित बाळबुद्धे, उमेश ठाकरे, सुरेश गोबाडे, दिनेश नाकाडे, आशिष गहाणे, हेमराज पुस्तोडे, एकनाथ बोरकर, सुनील कावळे, भूपेश ठाकरे, लिलेश्वर निमजे, अनिल गणवीर, दुलीचंद हुकरे, रोहन ठाकरे, मनिष सूर्यवंशी, अश्विन धोंडे, जितेंद्र बन्सोड, अतुल निनावे, राहुल गहाणे, आशिष निनावे, गजेंद्र डोमळे, हिवराज ठाकरे अशा २७ तरूणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. यावेळी रक्तदात्यांना रक्तगट व ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिरात रक्तदानाची प्रक्रिया गोंदिया व गडचिरोली येथील रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. रक्तदान शिबिरासाठी ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.