नुकसानग्रस्तांसाठी २.७० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:25 PM2017-11-03T23:25:06+5:302017-11-03T23:25:16+5:30
वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. निधीचे येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात यावे असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले आहे.
२१ मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाºयामुळे तालुक्यातील ३ हजार २५६ लोकांचे सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे यात नुकसान झाले होते. आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला होता. फक्त तटीय क्षेत्रातच वादळीवाºयाने ग्रस्तांसाठी नियम असल्याने जिह्यातील नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत होते. मात्र आमदार अग्रवाल यांनी विशेष बाब म्हणून मदत उपलब्ध करवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती.
यावर त्यांनी २.७० कोटींचा निधी मदतीसाठी मे महिन्यातच मंजूर केला होता. मात्र वित्त विभागाने आपत्ती घेत निधी वाटपावर रोक लावली होती. यावर आमदार अग्रवाल यांनी ३ आॅगस्ट रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उचलत विषय मांडला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेत निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. मात्र शासनाकडे निधी नसल्यामुळे व काही तांत्रीक अडचणींमुळे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची आचरसंहिता लागल्यामुळे निधीच्या वाटपावर रोक लावण्यात आली. मात्र १ नोव्हेंबर रोजी नवे आदेश काढल्यानंतर २.७० कोटींचा निधीन जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. प्रकरणी आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याशी चर्चा करून निधी वाटपाचे निर्देश दिले. तर येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.