२८ घाटांनी दिला १३ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:37 PM2017-11-06T20:37:18+5:302017-11-06T20:37:42+5:30
मागीलवर्षी बहुतांश रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे रेतीमाफीयांकडून रेती चोरी केली जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागीलवर्षी बहुतांश रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे रेतीमाफीयांकडून रेती चोरी केली जात होती. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत ई-निविदा व ई -लिलाव करण्यात आला. यात जिल्ह्यातील २८ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. या घाटांचा लिलाव १३ कोटी ५७ लाख ७२ हजार ७९२ रूपयांत झाला आहे. या २८ घाटांच्या लिलावासाठी शासनाला ६ कोटी १० लाख १८ हजार ३६८ रूपये अपेक्षीत होते. परंतु दुपटीपेक्षाही अधिक किंमतीत या घाटांचा लिलाव झाला आहे.
गोंदिया तालुक्यातील देवरी रेती घाट लिलावाची शासनाने अपेक्षीत रक्कम ६७ लाख ९५ हजार ८४६ रूपये ठेवली होती. परंतु हे घाट एक कोटी ५१ लाख ९१ हजार ८४६ रूपयांना विकत घेण्यात आले. किन्ही घाटची अपेक्षीत रक्कम २१ लाख २ हजार ४०३ रूपये होती. परंतु हे घाट ५० लाख १६ हजार ४०३, सतोना (महादेव) घाटची अपेक्षीत रक्कम १३ लाख ५८ हजार ९२८ रूपये होती. परंतु हे घाट ३४ लाख ६३ हजार ९२८ रूपयांना, मुरदाडा (नविन) घाटची अपेक्षीत रक्कम ३३ लाख ९८ हजार २२४ रूपये होती. परंतु हे घाट ८० लाख २७ हजार २२४ रूपयांना, सतोना (गावघाट) घाटची अपेक्षीत रक्कम १३ लाख ५८ हजार ९२८ रूपये होती. परंतु हे घाट ६० लाख ९३ हजार ९२८ रूपयांना विकत घेण्यात आले.
तिरोडा तालुक्यातील चांदोरी (बु.) घाटची अपेक्षीत रक्कम ३० लाख ५८ हजार ४० रूपये होती. परंतु हे घाट ५३ लाख ६६ हजार ४० रूपयांना, घाटकुरोडा-१ घाटची अपेक्षीत रक्कम एक कोटी २७ लाख ४२ हजार ४३७ रूपये होती. परंतु हे एक कोटी घाट ४१ लाख ४२ हजार ४७३ रूपयांना, बोंडराणी घाटची अपेक्षीत रक्कम ७६ लाख ४५ हजार १०२ रूपये होती. परंतु हे घाट एक कोटी ७० लाख ४४ हजार १०२ रूपयांना, घाटकुरोडा -२ घाटची अपेक्षीत रक्कम एक कोटी २७ लाख ४२ हजार ४३७ रूपये होती. परंतु हे घाट दोन कोटी ८४ लाख ९८ हजार रूपयांना विकत घेण्यात आले.
देवरी तालुक्यातील घोनाडी घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख ५९ हजार २७३ रूपये होती. परंतु हे घाट १ लाख ६९ हजार ३७३ रूपयांना, वासनी-१ घाटची अपेक्षीत रक्कम २ लाख ३८ हजार ६०९ रूपये होती. परंतु हे घाट २ लाख ४६ हजार ६०९ रूपयांना, आमगाव तालुक्यातील बाम्हणी घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट २७ लाख ३० हजार ७१० रूपयांना, ननसरी दुमोहन घाटची अपेक्षीत रक्कम ७ लाख ९६ हजार ३६५ रूपये होती. परंतु हे घाट ८७ लाख २० हजार रूपयांना, मानेकसा घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट २२ लाख ९३ हजार ७१० रूपयांना, घाट्टमेनी घाटची अपेक्षीत रक्कम १० लाख ६२ हजार २० रूपये ठेवली होती. परंतु हे घाट ६२ लाख २ हजार २० रूपयांना विकत घेण्यात आले.
सालेकसा तालुक्यातील भाडीपार घाटची अपेक्षीत रक्कम ८५ हजार ९४७ रूपये होती. परंतु हे घाट ९१ हजार ९४७ रूपयांना, धानोली रेती घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख ४३ हजार ४५ रूपये होती. परंतु हे घाट ४ लाख ४५ रूपयांना, दरबडा घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख २७ हजार ४१८ रूपये होती. परंतु हे घाट १ लाख ६८ हजार ४१८ रूपयांना, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव घाटची अपेक्षीत रक्कम ३ लाख ८२ हजार २५५ रूपये होती. परंतु हे घाट ३ लाख ९५ हजार २५५ रूपयांना, वडेगाव/बंध्या घाटची अपेक्षीत रक्कम ३ लाख १८ हजार ५४६ रूपये होती. परंतु हे घाट ३ लाख ७५ हजार ५४६ रूपयांना, सडक-अर्जुनी तालुक्यातील पिपरी-२ घाटची अपेक्षीत रक्कम ७ लाख ९६ हजार ३६५ रूपये होती. परंतु हे घाट ३० लाख ५१ हजार ३६५ रूपयांना, पळसगाव/राका घाटची अपेक्षीत रक्कम ११ लाख १४ हजार ९१० रूपये होती. परंतु हे घाट १७ लाख ८ हजार रूपयांना, कोदामेडी घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ७ लाख ७५ हजार ९२ रूपयांना, सावंगी-१ घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट ७ लाख ७५ हजार ७१० रूपयांना, वडेगाव घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ८ लाख ८० हजार ९२ रूपयांना,
घाटबोरी/तेली घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ११ लाख ६७ हजार ९२ रूपयांना, सावंंगी-२ घाटची अपेक्षीत रक्कम ८ लाख ४९ हजार २५५ रूपये होती. परंतु हे घाट २२ लाख ७६ हजार २५५ रूपयांना देवपायली घाटची अपेक्षीत रक्कम २ लाख ३८ हजार ६०९ रूपये ठेवली होती. परंतु हे घाट ५ लाख १ हजार ६०९ रूपयांना विकत घेण्यात आले.