नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:14 PM2017-12-26T23:14:18+5:302017-12-26T23:15:26+5:30

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, .....

28 towers in Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

Next
ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी वाढविणार : २०१२ च्या सर्वेक्षणातील १७ टॉवर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, यासाठी नक्षलग्रस्त भागात तीन आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १५ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. तर यापूर्वी शासनाची मंजुरी मिळालेले १० टॉवर लवकरच उभारण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून शहर आणि गावांना जोडण्याचा संकल्प केला आहे. दुर्गम भागात इंटरनेट, मोबाईलची सेवा मिळाल्यास या भागातील नागरिकांची पायपीट थांबेल.कामे वेळेत होण्यास आणि माहितीची आदान प्रदान करण्यास मदत होईल. तसेच नक्षलप्रभावीत भागात नक्षल्यांच्या कारवाया वेळीच हाणून पाडण्यासाठी सुध्दा या मोबाईल टॉवरची मोठी मदत होईल. केंद्र सरकारने कॅशलेसची संकल्पना पुढे आणली. मात्र कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पाहीजे त्या प्रमाणात साधने उपलब्ध नसल्यामुळे कॅशलेस सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. परंतु त्यासाठी पर्याप्त साधने उपलब्ध होत नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार होऊच शकत नाही. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मात्र, सुविधांअभावी नागरिक कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोबाईलला कव्हरेजच राहात नाही. बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बिजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी १० टॉवरला शासनाने मंजूरी दिली आहे. त्या टॉवरचे काम सुरू करण्यासाठी ई-निवीदा प्रक्रिया झाली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर १८ नविन टॉवर उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या १८ पैकी ३ टॉवर जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तर १५ टॉवर सीमा भागात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.

Web Title: 28 towers in Naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.