२९ हजाराचे सागवान जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:03 AM2021-09-02T05:03:22+5:302021-09-02T05:03:22+5:30
आमगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत कट्टीपार बीटमधील मुंडीपार क्षेत्रात वनविभागाचे अधिकारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सामूहिक गस्त घालीत असताना मध्य ...
आमगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत कट्टीपार बीटमधील मुंडीपार क्षेत्रात वनविभागाचे अधिकारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सामूहिक गस्त घालीत असताना मध्य प्रदेशमधून येत असलेला मिनी मेटाॅडोर क्र. एमएच ४९, डी १००६ टाटा गाडी अधिकाऱ्यांना आढळली. मिनी मेटाॅडोरचे चालक व अन्य दोन व्यक्ती अधिकाऱ्यांना पाहताच मेटाॅडोर सोडून पळून गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मेटॉडोर ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये सागवान चिरान लाकूड सिली १० नग आढळले. पाऊस सुरू असल्याने व रात्रीची वेळ असल्याने त्यांना पळून जाण्यात यश आले. सध्या चालक व त्या फरार दोन व्यक्तींचा शोध सुरू आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक आर.ओ. दसरिया, वनरक्षक एल.पी. बिसेन, के.यू. कदम, जी.आय. लांजेवार, ए.पी. ढगे, वनमजूर मेश्राम व भगत यांनी केली.