२९४ संस्था अवसायनात !

By admin | Published: September 4, 2015 12:04 AM2015-09-04T00:04:01+5:302015-09-04T00:04:01+5:30

मागील अडीच दशकात सहकार क्षेत्रात विविध संस्थांचा उदय झाला. सहकार क्षेत्राला सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने शहरी, ...

294 organization abstain! | २९४ संस्था अवसायनात !

२९४ संस्था अवसायनात !

Next

नेक संस्था बंद सर्वेक्षणात कागदोपत्री संस्थांचे काम उघडकीस
भंडारा : मागील अडीच दशकात सहकार क्षेत्रात विविध संस्थांचा उदय झाला. सहकार क्षेत्राला सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने शहरी, नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात हजारो सहकारी संस्था उघडण्यात आल्या. मात्र यातील हजारो संस्थांचे केवळ कागदावरच राहिल्या. यात भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर २९४ सहकारी संस्था बंद स्थितीत दिसून आले आहे.
सहकार विभागाने या सर्वच २९४ सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश जारी केले आहे. सहकार आयुक्तांनी परिपत्रक जारी करुन राज्यातील २ लाख ३०,९२५ नोंदणीकृत संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून सर्वेक्षण ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
भंडारा तालुक्यात ११५ संस्था बंद
भंडारा जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत १,३६३ सहकारी संस्थांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी २९४ संस्था अवसायनात असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४० सहकारी संस्थांमधून पाच संस्था अवसायनात आहेत. त्यापैकी एक बंद संस्थेला अंतिम आदेश जारी करण्यात आले आहे. चार संस्थांसाठी अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यात भंडारा तालुक्यातील ११५ सहकारी संस्था अवसायनात असून तुमसर तालुक्यातील ४७, मोहाडी तालुक्यातील ४२, लाखनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील २३, पवनी तालुक्यातील २० आणि लाखांदूर तालुक्यातील २७ सहकारी संस्था अवसायनात असल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना अंतिम आदेश जारी केले आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यात २९४ सहकारी संस्था अवसायनात आढळून आल्यानंतर १ जुलैपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. १,०६९ सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाअंतर्गत ६२५ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहे. सर्वेक्षणासाठी तीन ते सात कर्मचाऱ्यांचे एकूण सात चमू गठित करण्यात आले आहे. सहकारी संस्थांचे काम प्रत्यक्षात सुरू आहे किंवा नाही याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
- अजय कडू,
जिल्हा उपनिबंधक, भंडारा.
पवनीत दोन विणकर संस्था बंद
पवनी तालुक्यातील दोन विणकर संस्था बंद आहेत. मोहाडी तालुक्यातील एक आणि साकोली तालुक्यात दोन संस्थांना जूनमध्ये अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश जारी केले आहे. राज्य सरकारच्या आदेशाने जिल्ह्यात १ जुलैपासून सहकारी संस्थांचे सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात ५० सहकारी संस्था कागदोपत्री आढळून आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात कार्यरत सहकारी संस्थांची एकूण संख्येच्या तुलनेत २५ टक्के संस्था सहकार मूळ उद्देशापासून दूर आहेत.
२० ठिकाणी अवसायकाने सांभाळला पदभार
भंडारा जिल्ह्यात २९४ संस्था अवसायनात असल्यामुळे त्यांचे काम बंद आहे. यात २० सहकारी संस्थांचा पदभार अवसायकने सांभाळला आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यक्षेत्रात एका संस्थेचा पदभार अवसायकने सांभाळला असून तुमसर तालुक्यात सर्वाधिक आठ संस्थांचा पदभार अवसायकने स्वत:कडे ठेवला आहे. मोहाडी तालुक्यात तीन, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एक आणि पवनी तालुक्यात सहा सहकारी संस्थांचा पदभार अवसायकने सांभाळला आहे.

Web Title: 294 organization abstain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.