आमगाव येथे कर्करोग शिबिरा २ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:16+5:302021-08-27T04:32:16+5:30
जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. जनसामान्यांकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे २ सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी ...
जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. जनसामान्यांकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे २ सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी ११ वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत मोफत तपासणी आणि निदान केले जाणार आहे.
.................
जिल्ह्यात ३७ (१) (३) कलम लागू
गोंदिया : जिल्ह्यात २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहे. कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांवर शिथिलता बहाल करण्यात आल्याने जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत लोकांची गर्दी वाढत आहे. ३० ऑगस्ट रोजी श्री गोकुळाष्टमी, ६ सप्टेंबरला पोळा व १० सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी उत्सव प्रारंभ होणार असल्याने उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत सन १९५१ च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ३७ (१) (३) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी जयराम देशपांडे यांनी लागू केले आहे. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.