भरडाईसाठी ३ लाख क्ंिवटल धानाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:03 PM2019-01-24T22:03:19+5:302019-01-24T22:04:34+5:30

यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे.

Up to 3 lakh sqft power lift | भरडाईसाठी ३ लाख क्ंिवटल धानाची उचल

भरडाईसाठी ३ लाख क्ंिवटल धानाची उचल

Next
ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनचे धान : २६ हजार क्ंिवटल धान राईस मिलर्सकडे

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे.
मागील काही वर्षांत पावसाने दगा दिल्याने धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत असल्याचे दिसत आहे. परिणामी धान उत्पादक संकटात अडकले होते. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने धानाचे चांगले उत्पादन झाले. हेच कारण आहे की, मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.
खरेदी करण्यात आलेले धान पुढे भरडाईसाठी देऊन राईस मिलर्सकडून तांदूळ घेतले जाते. त्यानुसार, मार्केटींग फेडरेशनकडून ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धान भरडाईसाठी राईसमिलर्स कडून उचलण्यात आला आहे.
उचल करण्यात आलेल्या या संपूर्ण ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली असून त्यातील २ लाख २ हजार ११३ तांदूळ प्राप्त झालेला आहे. त्यातील १ लाख ७५ हजार ६०२ क्ंिवटल धान पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून प्राप्त व्हावयाचा आहे.
विशेष म्हणजे, ही सध्याची परिस्थिती असून मार्चपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची आकडेवारी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
१५३ राईस मिल्सचा करार
मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी धान राईस मिलर्सला दिला जातो. यंदा १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान मार्केटींग फेडरेशनने खरेदी केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणाता धानाची खरेदी व आता त्याची भरडाई करणे सोपे काम नाही. त्यामुळे धानाची भरडाई करण्यासाठी यंदा १५३ राईस मिल्ससोबत करार करण्यात आला आहे. करार झालेल्या या राईस मिल्सना धान देऊन आता त्यांच्याकडून धानाची भरडाई केली जाईल.

Web Title: Up to 3 lakh sqft power lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार