३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:23 PM2017-12-04T22:23:22+5:302017-12-04T22:24:05+5:30

सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.

300 km long deepening and repair | ३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

Next
ठळक मुद्दे४० किमी. मुख्य कालव्याचाही समावेश : आमदार अग्रवाल यांनी केली कामाची पाहणी

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. ही बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी जलसंपदा सचिवांसोबत बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश दिले होते. परिणामी बाघ प्रकल्पांतंर्गत येत असलेल्या ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्ती व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, यात ४० कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याचा समावेश आहे.
बाघ प्रकल्प जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असून सालेकसा तालुक्यात चार हजार, आमगाव तालुक्यात सात हजार व गोंदिया तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर अशाप्रकारे एकूण २३ हजार ५०० हेक्टर शेतीला यातून सिंचन केले जाते. मात्र प्रकल्पातील मुख्य व लघू कालव्यांची स्थिती खराब असल्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातच पाणी वाहून जाते. गोंदिया तालुक्यातील टोकावर असलेल्या शेतीला पाणी पोहचत नाही. परिणामी काटी, बिरसोला, देवरी, सोनबिहरी, छिपीया, पांजरा, गिरोला आदि भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.
ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी, मुंबई येथे जलसंपदा सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागातील अन्य अधिकाºयांची बैठक घेतली. यात त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली दिसत असले तरिही केवळ १५००-२००० हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकºयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेत तालुक्यातील संपूर्ण ३०० कि.मी. कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम नसल्यामुळे हीच संधी साधून लवकरात लवकर काम करण्यास सांगीतले.
यावर सचिव चहल यांनी अभियांत्रीकी विभागातील अधिकाºयाना गोंदिया तालुक्यातील ३०० कि.मी. लांबीचे कालवे तसेच सालेकसा, आमगाव तालुका होत गोंदिया तालुक्यात येत असलेल्या सुमारे ४० कि. मी. लांबीच्या मुख्य कालव्याची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले.
यासाठी लागेल तेवढ्या यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार कालव्यांच्या सफाई व दुरूस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पांढराबोडी-दासगाव दरम्यान सुरू आहे. येथे आमदार अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना या कामबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्या
जलसंपदा सचिव चहल व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वीच कालव्यांच्या सफाईचे काम करण्यात आल्याचे सांगीतले. यावर मात्र आमदार अग्रवाल यांनी आक्षेप घेत किती कि.मी. कालव्यांची सफाई झाल्याचे विचारले असता त्यांच्या या प्रश्नावर अधिकाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांत ५-१० कि.मी. कालव्यांच्यी सफाई योग्य बाब नसल्याचे ठणकावून सांगीतले. पाण्या अभावी शेतकरी कंगाल होत असताना शासन फक्त मदतीच्या घोषणा करीत आहे. मात्र हे पुरेसे नसून शासनाने अधिकाºयांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.

Web Title: 300 km long deepening and repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.