३०८३१ शेतकऱ्यांनी काढला पीक विमा
By admin | Published: August 17, 2016 12:04 AM2016-08-17T00:04:00+5:302016-08-17T00:04:00+5:30
जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन पध्दतीने मांडण्यात आली.
२.३५ कोटींचा विमा : शेतकऱ्यांनी भरली २ टक्के रक्कम
नरेश रहिले गोंदिया
जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन पध्दतीने मांडण्यात आली. त्यामुळे आता कमी किंमतीत अधिकचा विमा देऊन शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात आले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ३० हजार ८३१ शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या पिकांचा २ कोटी ३५ लाखांचा विमा उतरविला आहे.
जुन्या पीक विम्यात केवळ नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना मदत मिळत होती. त्या विम्यासाठी ८ ते १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. परंतु आता फक्त २ टक्के रक्कम भरून पीक विमा संरक्षण मिळविण्यासाठी केंद्र सरकाने नविन पध्दतीने पीक विमा योजना आणली आहे. जून्या पीक विम्यात किड किंवा इतर आजारामुळे पीके नष्ट झाली तर त्यांना संरक्षण मिळत नव्हते. परंतु आता किड व आजारालाही संरक्षण देण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील ३० हजार ८३१ शीतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्या पीक विम्याची रक्कम २ कोटी ३५ लाख रूपये घेतली आहे. प्रतिहेक्टरवर ३९ हजार रूपये पिक विम्याचे संरक्षण देत आहे. एका एकरवर १५ हजार ६०० रूपयाचा पीक विमा दिला जात आहे. जिल्ह्यात धानाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अवर्षण, पूर, किडीचा प्रादुर्भाव सहन करावा लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभे होते. या संकटातून सावरण्यासाठी ही योजना अधिक सोयीस्कर झाली आहे.