जिल्ह्यातील 314 बाधितांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:00 AM2022-01-31T05:00:00+5:302022-01-31T05:00:12+5:30
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून कोरोनावर मात करणारे जास्त निघत असल्याने ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही आता उतरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच मात करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. तर रविवारीही (दि.३०) जिल्ह्यात १६९ नवीन बाधितांची भर पडली असतानाच तब्बल ३१४ बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. मात्र एका मृताची नोंद घेण्यात आल्याने मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून कोरोनावर मात करणारे जास्त निघत असल्याने ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही आता उतरली आहे.
रविवारी (दि.३०) जिल्ह्यात जेथे १६९ बाधितांनी भर पडली आहे तेथेच ३१४ बाधितांनी कोरोनाला मात दिली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १३१० झाली आहे. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यातील बाधितांची संख्या आता ४०० एवढी झाली असून यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसत आहे.
आणखी एका बाधिताचा मृत्यू
- एकीकडे जेथे रुग्ण संख्या वाढत आहे, तेेथेच दुसरीकडे मृतांची संख्यासुद्धा वाढत असल्याने ही बाब टेन्शन वाढविणारी ठरत आहे. दुसऱ्या लाटेत जून महिन्यापर्यंत मृतांची नोंद घेण्यात आली होती. मात्र आता नवीन वर्षांतच ४ बाधितांच्या मृत्यूची नोंद असून यात रविवारी एका मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे मृतांचा आकडा आता ५८४ झाला आहे.
नियमांचे पालन अत्यावश्यक
- सध्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच तेवढ्याच गतीने रुग्ण बरे होताना दिसत आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी मोजकेच रुग्ण भरती होत असून त्यांनाही गंभीर लक्षणे नाहीत. नेमकी हीच बाब हेरून जिल्हावासी तिसऱ्या लाटेला अगदी हलक्यात घेताना दिसत आहेत.