मेळाव्यात ३२ शाळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:43 PM2018-01-13T23:43:07+5:302018-01-13T23:45:41+5:30
भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेत स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेत स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील ३२ शाळांनी सहभाग दर्शविला. त्यामध्ये ६९० स्काऊट-गाईड व स्काऊट-गाईडर यांनी सहभाग घेतला.
उद्घाटन माजी महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम व नलू राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड मेळाव्यात वेळापत्रकाप्रमाणे दिवसाची सुरुवात सकाळी रॅलीने करण्यात आली. मेळाव्यात चित्रकला, निबंध, आनंद मेळावा, बिनभांड्यांचा स्वयंपाक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे तंबू निरीक्षण, प्रदर्शनी, देशभक्तीपर समूहगीत गायन, लोकनृत्य, शोभायात्रा, हस्तकौशल्य स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये स्काऊट-गाईड यांनी सहभाग घेतला.
शोभायात्रेचे उद्घाटन विद्यानिकेतन आमगावचे प्राचार्य कमलबापू बहेकार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊराव पत्रे, व्ही. डी. मेश्राम, दिनेश रहांगडाले उपस्थित होते.
जिल्हा मेळाव्याचा शेवटच्या दिवशी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. स्काऊट-गाईड यांना बक्षीस वितरण करण्यात आले. मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व स्काऊट-गाईड यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, सारिका बांगडकर, माधवी मुरमाडे, तहसीलदार बोरुले, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, शिक्षण विस्तार अधिकारी निलकंठ सिरसाटे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्राचार्य लांजेवार, शिक्षणाधिकारी यु.के.नरड, जिल्हा आयुक्त व्ही.आर.भगत, विद्या खेडुलकर, जी.एस.चिंधालोरे, पी.एस.मेश्राम, संजय आर. बेलोरकर, मनिषा तराळे, बुरडे, रहांगडाले, एम.डब्ल्यु.नंदनवार, तथा मेळावा प्रमुख बावणकर, आर.एस.वैैष्णव व गावकरी उपस्थित होते.