३२ हजारावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:10+5:30

बँकानी दिलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २० हजार ३३३ शेतकरी आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे १२ हजार शेतकरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहे.यासर्व शेतकऱ्यांवर एकूण ८१ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज असून तेवढे कर्ज या योजनेतंर्गत माफ होणार असल्याची माहिती आहे.

32 thousand farmers will get loan waiver benefit | ३२ हजारावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ

३२ हजारावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ

Next
ठळक मुद्देआधारकार्ड लिकिंग पूर्ण : २५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार प्रक्रिया, ८१ कोटींचे कर्ज होणार माफ

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे.या अंतर्गत प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ३२ हजार ५६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार असून या सर्व शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधारकार्ड लिकिंगची प्रक्रिया सुध्दा पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. तसेच या योजनेचा लाभ शेतकºयांना त्वरीत मिळावा यासाठी सर्व जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश दिले आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करण्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करुन मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाची यंत्रणा कामाला लागली आहे. कृषी कर्ज आणि पीक कर्जाची उचल ही सर्वाधिक जिल्हा बँकेतून शेतकरी करीत असतात. या बँकेतून कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. महाविकास आघाडीने सरकारने घोषीत केलेल्या शेतकरी कर्जमाफीस प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ३२ हजार ५६ शेतकरी पात्र ठरले आहेत.
हा आकडा अंतीम नसून यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकानी दिलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २० हजार ३३३ शेतकरी आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे १२ हजार शेतकरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहे.यासर्व शेतकऱ्यांवर एकूण ८१ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज असून तेवढे कर्ज या योजनेतंर्गत माफ होणार असल्याची माहिती आहे.
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असून यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक असणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी मिशन मोडवर हे काम हाती घेऊन पूर्ण केले आहे.
जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून ही सर्व प्रक्रिया २५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आधारकार्ड लिंक करण्यात जिल्हा बँक आघाडीवर
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र सर्व शेतकºयांना मिळावा. एकही शेतकरी यापासून वंचित राहू नये याकरिता गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी जिल्हा बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याशी आधारकार्ड लिंक करण्याचे काम मिशन मोडवर करण्याचे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांचे खाते आधारकार्डसह लिंक केले आहे. आधारकार्ड लिंक करण्यात जिल्हा बँक आघाडीवर आहे.
फेब्रुवारीपासून लाभ मिळण्याची शक्यता
महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकºयांना लवकरात लवकर मिळावा यासाठी बँकाची यंत्रणा देखील युध्दपातळीवर कामाला लागली आहे. पात्र ठरलेल्या शेतकºयांचे आधारकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच यातील काही त्रृटी असल्यास त्या देखील २५ जानेवारीपर्यंत पूर्ण दूर करण्याचे ध्येय बँकानी ठेवले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: 32 thousand farmers will get loan waiver benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.