केंद्राकडून कचारगडसाठी ३.२६ कोटी
By admin | Published: February 23, 2016 02:18 AM2016-02-23T02:18:30+5:302016-02-23T02:18:30+5:30
कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६
सालेकसा : कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६ लाख मंजूर करण्यात आले असून येत्या मार्च अखेर तो निधी कचारगडच्या विकासासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी गोंडवाना महासंमेलनादरम्यान मार्गदर्शन करताना दिली.
गोंडवाना महासंमेलनाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णिचे आ. तोडसाम, गोंडराजे वासुदेव शाह टेकाम, भाजप नेते राकेश शर्मा, जि.प. सदस्य विजय टेकाम, गोंडी धर्माचार्य दादा हिरसिंह मरकाम, शेरसिंह आचला यांच्यासह अनेक राज्यातून आलेले आदिवासी समाजाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व प्रथम भूमकाल यांनी १२ सगापेन व ७५० गणगोत पूजा करुन उद्घाटन महोदयांना दीप प्रज्वलित करण्यात लावले. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमगावचे आमदार संजय पुराम यांनी हळदीचा पिवळा टीेका लावून अतिथीचे स्वागत केले.
या प्रसंगी खा. नेते म्हणाले की गोंडी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून यात पर्यावरण रक्षणासाठी विशेष भर दिला जातो. खऱ्या अर्थाने आदिवासी समाज हा नैषर्गिक संपत्तीचा रक्षण कर्ता आहे. म्हणून त्यांच्या श्रद्धास्थाने विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आदिवासीचे सुद्धा विकास होईल. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले की संस्कृती व परंपरा जपण्यामध्ये आदिवासी समाज सदैव तत्पर राहीला आहे. मागासलेला असला तरी निषर्गातील संपत्तीचे रक्षण करणे, परंपराच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणे या समाजाला माहित आहे. आ. पुराम म्हणाले कचारगडच्या विकासातच आदिवासीचा विकास लपलेला आहे. त्यामुळे सर्वांनी कचारगडच्या विकासात सहकार्य करण्याची गरज आहे. कचारगड आता विकासाचा वाटेवर आला असून येणाऱ्या काळात निश्चित याचा कायापालट होणार यात शंका नाही.
प्रास्ताविक मांडताना कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी कचारगडच्या विकासासाठी शासन स्तरावरील ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत प्रकट केले. उपस्थित पालक मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन केले की या परिसरात वर्षभर पिण्याच्या पाण्याची वीजेची व आरोग्याची सेवा मिळावी यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाला समितीचे माजी अध्यक्ष शंकलाल मडावी, भाजप अध्यक्ष परणसराम फुंडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाबा लिल्हारे, राजेंद्र बडोले, चंद्रलेखा कंगाली, संस्थापक गोपालसिंह उईके, आदी उपस्थित होते. संचालक पर्वतसिंह कंगाली यानी केले. आभार सचिव संतोष पंधरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रमणलाल सलाम, मनिष पुसाम, बारेलाल वरकडे, सुरेश परते, रामेश्वर पंधरे, शकुनतला परते, मनोज इळपाते, राधेश्याम टेकाम, विरेंद्र उईके आदिनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)