३३९ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी २१ लाख दिले

By admin | Published: September 12, 2016 12:31 AM2016-09-12T00:31:55+5:302016-09-12T00:31:55+5:30

आता वाहनांना आकर्षक क्रमांक मिळावे यासाठी वाहन मालकांची इच्छा असते. ही इच्छा पाहून शासनाने या आकर्षक क्रमांकातून महसूल मिळावे याची सोय केली.

33 9 Given 21 lakhs for the attractive number of vehicles | ३३९ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी २१ लाख दिले

३३९ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी २१ लाख दिले

Next

गोंदिया : आता वाहनांना आकर्षक क्रमांक मिळावे यासाठी वाहन मालकांची इच्छा असते. ही इच्छा पाहून शासनाने या आकर्षक क्रमांकातून महसूल मिळावे याची सोय केली. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी ३३९ वाहन चालकांनी मागील दिड वर्षात २१ लाख ७ हजाराचा महसूल दिला.
शासनाने १९९९ पासून आकर्षक क्रमांकाला पैसे ठेवले. परंतु १० हजारात मनपसंतीचा क्रमांक देण्याचे ठरविले होते. काही आकर्षक क्रमांक गेल्यानंतर उर्वरित क्रमांक विक्रीला जात नव्हते. ते क्रमांक पडून रहायचे. शासनाने पुन्हा बदल करुन १० हजार ते २ लाखापर्यंत क्रमांकाना पैसे ठेवून ज्या क्रमांकाना विशेष आकर्षण आहे. अशा क्रमांकांना जास्त दर ठेवण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात व्हीआयपी क्रमांक घेणाऱ्या १७० वाहनांकडून ११ लाख १ हजार रुपये तर सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १६९ वाहनांसाठी क्रमांक घेणाऱ्या वाहन चालकांनी १० लाख ६ हजार रुपये मोजले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

एका दिवसात एकापेक्षा अनेक लोकांना एकच क्रमांक हवा असेल तर त्यासाठी त्या वाहन चालकांना त्या क्रमांकासाठी मोजणारी रक्कम डीडीच्या रुपात लिफाफ्यात बंद करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे दिले जाते. सर्वांच्या समोर बंद लिफाफे उघडल्यावर ज्या वाहन चालकाने अधिकचे पैसे देण्याचे ठरविले. त्या वाहन चालकाला तो आकर्षक क्रमांक दिला जातो.

Web Title: 33 9 Given 21 lakhs for the attractive number of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.