संजय गांधी योजना समितीत ३३२ प्रकरणे मंजूर
By admin | Published: June 25, 2017 01:01 AM2017-06-25T01:01:03+5:302017-06-25T01:01:03+5:30
संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली.
समितीचे अध्यक्ष भरत क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सभेत प्रामुख्याने तहसीलदार के.डी.मेश्राम, सदस्य जयंत शुक्ला, सविता बेदरकर, ऋषीकांत शाहू, सुरेश चंदनकर, मैथली पुरोहित, सेवेंद्र बिसेन, कुशल अग्रवाल, पंकज सोनवाने, रजनी रंगारी, नायब तहसीलदार पराते, लिल्हारे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे ९३ व श्रावणबाळ योजनेचे १०४ अशी एकूण १९७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे मागील २०१६-१७ मध्ये ३३२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे.
आजघडीला शहरातील सदर योजनेतून एकूण दोन हजार १६५ लाभार्थी असून अनुदान त्यांच्या बँक खात्यात नियमित जमा करण्यात येते.