कत्तलखान्यात जाणाऱ्या ३४ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:08 PM2018-09-16T22:08:33+5:302018-09-16T22:10:38+5:30
गोरेगाव पोलिसांनी शनिवारी (दि.१५) केलेल्या दोन कारवाईत पाच वाहनांमधून ३४ जनावरांची सुटका करण्यात आली. पहिली कारवाई रात्री ८ वाजता पाथरी येथे तर दुसरी कारवाई रात्री १० वाजता बबई ते मोहाडी रस्त्यावर रात्री १०.३० वाजता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव पोलिसांनी शनिवारी (दि.१५) केलेल्या दोन कारवाईत पाच वाहनांमधून ३४ जनावरांची सुटका करण्यात आली. पहिली कारवाई रात्री ८ वाजता पाथरी येथे तर दुसरी कारवाई रात्री १० वाजता बबई ते मोहाडी रस्त्यावर रात्री १०.३० वाजता करण्यात आली. पकडलेल्या जनावरांना पिंपळगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आले.
गोरेगाव येथे बुधवारला बैल बाजार भरतो तर आमगाव येथे शुक्रवारला बाजार भरतो. त्यामुळे बाजाराच्या दुस-या दिवशी आमगाव ते ठाणा मार्गे तिरोडा,व चिल्हाटी पंचवटी मार्गे नागपूर अशी जनावरांची वाहतूक केली जाते. पाथरी व पंचवटीत पोलिसांनी या कत्तलखान्यात जाणा-या जनावरांना पकडले. ट्रक एमएच ३५ ए.जे. ५६१ मध्ये ८ म्हैस व १० रेडे डांबून वाहतूक करण्यात येत होती.
या प्रकरणात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक एमएच ३५ ए.जे. ५६१ चा चालक मोहमद आरीफ मोहम्मद खलीत (३०) रा. टेकानाका नागपूर, संजय हरिचंद कोहरे (३५) रा. मोहनटोला, आमगावच्या कुंभारटोली येथील १० वर्षाचा बालक, दुर्गेश प्रकाश मोहबे (२२) रा. कुंभारटोली आमगाव व वशीम नाशीम कुरेशी (२४) रा. आमगाव यांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या मालाची किंमत २१ लाख रूपये सांगितली जाते. त्यानंतर रात्री १०.३० वाजता बबई ते मोहाडी या रस्त्यावर एम.एच.३४ पी.जी. १००५, एम.एच.३४ ए.बी. ००४३, एम.एच.२८ ए.बी. ५६०२, एम.एच.३१ बी.एच.३३४२ या चार वाहनांमध्ये १६ जनावरे डांबले होते. जनावरे व जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत २० लाख ४० हजार रूपये सांगितली जाते.
या प्रकरणात कोठारी येथील प्रदीप बाबाराव गिरूळकर (२२), राकेश आनंदराव डोंगरवार (२१), अतुल जागेश्वर कावळे (२९), सचिन चंदू शेंडे (३०), राधेश्याम भाऊजी हिवरे, परसोडी येथील मनोज चन्नेकर, गोरेगाव येथील विक्रम नरेश सुकारे (२२), संतोष श्रीराम राईत (२५), नरेश सदाशिव सुकारे, सम्राट कांतीलाल येवले (२७), राम इसन मेश्राम (४०), दीपांकर रामदास वालदे व पंचवटी येथील साहेबराव ठाकूर यांच्यावर प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ७,९ महाराष्टÑ पशूसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.