३५ हजार महिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:40 PM2017-11-01T23:40:28+5:302017-11-01T23:40:40+5:30

स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली.

35 thousand women have the basis for the brilliance of cooking | ३५ हजार महिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार

३५ हजार महिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देडोळ्यांचा त्रास टळणार : धूर व चुलींपासून महिलांची मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली. चुलीवर स्वयंपाक करताना चुलीतील जळत्या निखाºयांवर फुंकर मारताना निघणाºया धुरामुळे महिलांना डोळ्याचे आजार होतात. महिलांना होणारा हा त्रास आता प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेमुळे कमी झाला आहे. जिल्ह्यातील ३५ हजार ४०१ महिलांच्या घरातील गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे पेटण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी मोठा आधार झाला आहे.
काबाडकष्ट करणाºया दारिद्र्य रेषेखालील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा जिल्ह्यात प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा १८ वर्षे पूर्ण केलेल्या विवाहित महिलेच्या कुटूंबाला या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेणाºया कुटूंबाला सिलिंडरचे १२५० रुपये, रेग्युलेटरची सुरक्षा ठेव राशी १५० रु पये, १०० रु पये सुरक्षा होज, गॅस पासबुकचे २५ रूपये आणि तपासणी शुल्क, इन्स्ट्रॉलेशन व प्रशासकीय शुल्क ७५ रुपये असे एकूण १६०० रु पये भरावे लागतात. हे पैसे केंद्र सरकारकडून लार्भाथ्याला कर्ज स्वरूपात दिल्या जाते. २ बर्नर असलेली शेगडी ९९० रुपयांमध्ये दिली जात आहे. रिफील गॅस हे कंपनीकडून ग्राहकाला कर्ज स्वरूपात दिल्या जात आहे. गॅसमुळे जर अपघात होवून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती ६ लाख रूपयांचा विमा सुध्दा काढण्यात येत आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ लाख ८९ हजार ८३ कुटुंबांनी तर शहरी भागातील १४ हजार ८५ कुटुंबांनी नोंदणी केली आहे. १ लाख ४२ हजार २१९ कुटुंबांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले असून या योजनेसाठी ७१ हजार १४० कुटुंब पात्र ठरले आहे. त्यापैकी ३५ हजार ५७० कुटुंबांकडे पूर्वीचेच गॅस कनेक्शन असल्यामुळे उर्वरित ३५ हजार ४०१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
ग्रामीण महिला शेतीची कामे करतात. जंगल व शेत परिसरातून आणलेल्या जळतणावर दोन्ही वेळचा स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे त्यांना धुराचा सामना करावा लागतो. त्यामुळेमुळे त्यांना डोळ्यांच्या विकारांचा सामनादेखील करावा लागत होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून आता त्यांना गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे स्वच्छ इंधन प्राप्त झाले. हजारो घरी उज्वला योजनेतून गॅस पेटला आणि चुली व धुरापासून महिलांना मुक्तता मिळाली आहे.

Web Title: 35 thousand women have the basis for the brilliance of cooking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.