३.५६ लाखांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:22 AM2017-09-25T00:22:12+5:302017-09-25T00:24:33+5:30

अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला डुग्गीपार पोलिसांनी पकडून ३.५६ लाख रूपयांची देशी दारू पकडली.

3.56 lakh liquor was caught | ३.५६ लाखांची दारू पकडली

३.५६ लाखांची दारू पकडली

Next
ठळक मुद्देडुग्गीपार पोलिसांची कारवाई : वाहनातील तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला डुग्गीपार पोलिसांनी पकडून ३.५६ लाख रूपयांची देशी दारू पकडली. सौंदड ते परसोडी मार्गावर पोलिसांनी शनिवारी (दि.२३) दुपारी १२.२५ वाजता ही कारवाई केली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ३.५६ लाख रूपयांची देशी दारू व ४ लाख रूपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण ७ लाख ५६ हजार २२८ रूपयांचा माल जप्त केला आहे.
सविस्तर असे की, पोलीस पथक पेट्रोलींगवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथक सौंदड ते परसोडी गावाकडे जाणाºया रस्त्यावर पेट्रोलींग करीत होते. दरम्यान बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३५-के ४४१४ त्यांना येताना दिसले पथकाने त्याला थांबविले. पथकाने वाहनाची पाहणी केली असता मागील डाल्यात त्यांना ७५० मिली.च्या देशी दारूच्या ६०० बॉटल्स, १८० मिली.च्या३१२० बॉटल्स, ९० मिली.च्या २५०० बॉटल्स असा एकूण ३ लाख ५६ हजार २२८ रूपयांच्या देशी दारूच्या पेट्या दिसून आल्या.
विशेष म्हणजे चालकाकडे दारूची वाहतूक करण्याचा परवाना नसल्याने पोलिसांनी ३ लाख ५६ हजार २२८ रूपयांची देशी दारू, ४ लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ७ लाख ५६ हजार २२८ रूपयांचा माल जप्त केला. तसेच वाहन चालक विनोद रामकृष्ण राऊत (२०,रा.सेंदूरवाफा), होमेश्वर वंगनू शिवणकर (४५,रा.सोनपूरी,साकोली) व राजेश भिवाजी वाढई (२९,रा.साकोली) यांना अटक केली.
 

Web Title: 3.56 lakh liquor was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.