आॅपरेशन आॅल आऊटमध्ये ३६ जणांना समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:35 PM2018-10-29T21:35:09+5:302018-10-29T21:35:30+5:30
जिल्हा पोलिसांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री ७ वाजता ते ११ वाजता दरम्यान राबविलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये पोलिसांनी ३६ जणांना समन्स बजावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री ७ वाजता ते ११ वाजता दरम्यान राबविलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये पोलिसांनी ३६ जणांना समन्स बजावले आहेत.
नॉन बेलेबल ७ जणांना वारंट बजावले आहेत. पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या कारवाईत महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये १२ प्रकरणे दाखल करून ९ हजार ८६५ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. त्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाकाबंदी दरम्यान ८६९ वाहने तपासण्यात आले. यातील ५२ वाहन चालकांना १५ हजार ६०० रूपयाचा दंड करण्यात आला आहे.
महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, ७ पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक २७३ पोलीस कर्मचाऱ्यांचा आॅपरेशन आॅल आऊटमध्ये सहभाग होता.