जंगलातील आगीने ३७ पक्ष्यांचा मृत्यू
By admin | Published: May 23, 2017 12:52 AM2017-05-23T00:52:21+5:302017-05-23T00:52:21+5:30
सडक-अर्जुनी व गोरेगाव तसेच देवरी या तिन तालुक्याच्या परिसराला लागून वनविकास महामंडळाच्या जंगलाला भिषण आग लागल्याने ...
शेंडा-खामतलाव परिसरातील घटना : वनविकास महामंडळाच्या जंगालाल भिषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी व गोरेगाव तसेच देवरी या तिन तालुक्याच्या परिसराला लागून वनविकास महामंडळाच्या जंगलाला भिषण आग लागल्याने या जंगल परिसरात आगीमुळे ३७ पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही घटना १९ मे रोजी पक्षी व निसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या वन्यप्रेमीना लक्षात आली.
शेंडा वनपरिसरात असलेल्या खामतलाव येथे वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागली. आगीपासून जीव वाचविण्यासाठी गवतावरील किडे उडत असताना या किड्यांचे भक्ष्य करणारे पक्षी आगीच्या समोर समोर किडे खाण्यासाठी जात असताना धुरामुळे त्याच्या श्वास गुदमरुन या पक्ष्याच्या मृत्यू झाला. तेंदूपत्ता तोडणाऱ्यांनी सदर आग लावल्याची कुणकुण आहे. या परिसरात वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले. परंतु आगीमुळे विविध ३७ पक्ष्यांच्या मृत्यू झाला.