ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर तरुणाची ३.७३ लाखांची फसवणूक, सहा जणांवर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: December 15, 2023 07:27 PM2023-12-15T19:27:46+5:302023-12-15T19:28:38+5:30
तिरोडाच्या प्रगतीनगरातील दिनेश गणपत कावडकर (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांना आपली रक्कम माझ्याकडे गुंतवणूक कराल तर तुमची रक्कम दाम दुप्पट करून देईल, असे आमीष दिले होते.
गोंदिया : तिरोडा गजानन मंदिराजवळील डॉ. रहांगडाले कॉम्प्लेक्स येथे १० एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ वाजता सहा आरोपींनी ऑनलाइन ट्रेडिंग करून दामदुप्पट करून देतो म्हणून एकाची ३ लाख ७३ हजार ५०० रूपयाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तिरोडाच्या प्रगतीनगरातील दिनेश गणपत कावडकर (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांना आपली रक्कम माझ्याकडे गुंतवणूक कराल तर तुमची रक्कम दाम दुप्पट करून देईल, असे आमीष देऊन दिनेश गणपत कावडकर (४३) यांची ३ लाख ७३ हजार ५०० रुपयाने फसवणूक केली. यासंदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अतुल बाबरू आसटकर (४३) व मृणाल उर्फ रोशन अतुल आसटकर (२६) दोन्ही रा. गजानन मंदिर परिसर गार्डन जवळ शास्त्री वॉर्ड तिरोडा, परवेज पटेल उर्फ पप्पू पटेल (५०) व वसीम उर्फ नौशाद पठाण (३०) दोन्ही रा. बिलाल इंटरप्राईजेस हसनबाग नागपूर, गुड्डू उर्फ अखिल पटेल (४८) रा. बीडीपेठ नागपूर व कमलेश बगडे (३५) रा. चिरेखनी या सहा जणांनी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दिनेश कावडकर यांना ऑनलाईन ट्रेडिंगतून दाम दुप्पट करून देतो म्हणून त्यांना ३ लाख ७३ हजार ५०० रुपयाने त्यांची फसवणूक केली आहे. या घटने संदर्भात तिरोडा पोलिसांनी सहाही आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे करीत आहेत.