रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: February 2, 2024 09:48 PM2024-02-02T21:48:25+5:302024-02-02T21:48:39+5:30

आठ जणांची केली फसवणूक

38.50 lakh looted in the name of forming a partnership in railway catering tender | रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल

रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल

गोंदिया: आय आर सी टी सी रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी देण्याच्या नावावर सात जणांकडून ३८ लाख ५० हजार रूपये लुटणाऱ्या महिलेवर रामनगर पोलिसात २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता राजकुपूर शेंडे रा. साई मंदिर गोविंदपूर गोंदिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. तीने आठ जणांना सारखेच आमिष देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.

गोंदिया शहराच्या पाल चौकातील मम्मी हाऊस नावाचे रेस्टॉरंट चालविणारी संगीता राजकुपुर शेंडे हिने आठ जणांना आय आर सी टी सी रेल्वे कॅटरींगच्या टेंडर घेतला आहे. त्यातून चांगला नफा कमवित आहे. यासाठी पैसे गुंतवावे लागतात. आपण पैश्याची मदत केली तर आपल्याला चांगला नफा होईल असे सांगून आठ जणांकडून ३८ लाख ५० हजार रूपये टप्या-टप्याने घेतले. १२ एप्रिल २०२३ रोजी गोंदिया येथील तिच्या मम्मी हाऊस रेस्टारेंटमध्ये फिर्यादी राखी चंदन भारद्वाज (४५) रा. गजानन कॉलोनी साई सरनम अपार्टमेंटच्या जवळ गोंदिया यांनी दिले होते.

सन २०२२ मध्ये एका कार्यक्रमात राखी भारद्वाज यांची संगिता राजकपूर शेंडे रा. साई मंदिर गोविंदपूर गोंदिया हिच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी तिने ती भाडयाने मम्मी हाऊस नावाचे रेस्टॉरेंट पालचौक, गोंदिया येथे चालवित होती. त्यानंतर त्यांची वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात भेट होत होती. एकदा संगिता शेंडे हिने सामाजिक कार्यक्रमादरम्यान एक रेल्वे कॅटरिंगचे टेंडर घेतले आहे, त्याकरिता एक चांगली पार्टनर हवी आहे. त्या भागिदारीमधून चांगला आर्थिक फायदा होतो असे तिने विश्वासपूर्वक सांगितले. त्यावरून संगीतासोबत त्यांनी भागीदारी करण्यास सहमती दर्शविली. १२ एप्रिल रोजी संगीताला तिचा पती राजकपूर शेंडे याच्यासमोर ४ हजार रूपये दिले. त्याचा लाभ म्हणून तिनी २ हजार रूपये फायदा झाल्याचे सांगून परत केले. त्यानंतर ६० हजार मागीतले. पुन्हा ८ मे २०२३ ला कॅटरींसाठी आणखी पैश्याची गरज असल्याचे सांगितल्याने त्यांनी ओळखीचे धनंजय ठाकूर यांच्या फोन पे वरून संगिता शेडे हिच्या फोन पे वर ४० हजार टाकले. परंतु भारद्वाज यांचा फायदा न झाल्याने त्यांनी पैशाबाबत विचारणा केली असता तीने टाळाटाळ केली. मग फोन उचलने बंद केले. त्यानंतर धमकी देत तुला जे करायचे आहे ते कर असे म्हणाली. नाईलाजाने त्यांनी रामनगर पोलिसात तक्रार केली. रामनगर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी भादंविच्या कलम ४२०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यांची केली फसवणूक

राखी भारद्वाज यांची एक लाखाने, निरजा किशोरकुणाल अग्रवाल रा. मामा चौक, सिव्हील लाईन, गोंदिया यांच्याकडून २ लाख ५० हजार, अर्चना संतोष शर्मा रा. सिव्हील लाईन गोंदिया यांच्याकडून ८ लाख, जयशीला किशोर उके रा. गजानन कॉलोनी, गोंदिया यांच्या कडून ८ लाख, जया सौरभ शर्मा रा. क्रिष्णपुरावाॅर्ड, गोंदिया यांच्याकडून ६ लाख रुपये, रेखा सुरज वर्मा रा. किष्णपुरावाॅर्ड, गोंदिया यांच्याकडून २ लाख रूपये, मोहन दिवाकरराव अंबुलकर रा. हनुमान नगर, गोंदिया यांच्याकडून ३ लाख रूपये, उमेश धनलाल बावणकर रा. मोहगाव ता. गोरेगाव याच्याकडून ४ लाख रुपये असा एकूण ३८ लाख ५० हजाराने फसवणूक करण्यात आली.

Web Title: 38.50 lakh looted in the name of forming a partnership in railway catering tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.