वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:32 PM2018-05-04T23:32:58+5:302018-05-04T23:32:58+5:30

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे.

391 children die in the year | वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान अपयशी : मागील वर्षीच्या तुलनेत अर्भक व बाल मृत्यूदरात वाढ

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले ‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.
जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये नवजात व बालमृत्यू ३३८ होते. सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी ३९१ च्या घरात गेली. गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यू दर राज्याच्या बालमृत्यू दरापेक्षा कमी असला तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तिरोडा व सडक-अर्जुनी या तालुक्यातील आकडेवारी स्थिर आहेत. आमगाव, देवरी व अर्जुनी-मोरगाव मधील आकडेवारी कमी आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ६०७ प्रसूती झाल्या. यात १६ हजार ४९० सुदृढ बालके जन्माला आली. नवजात मृत्यू दर २०.५० टक्के होता. तर सन २०१७-१८ या वर्षात १७ हजार ९०० प्रसूती झाल्या. यात १७ हजार ६१६ सुदृढ बालकांनी जन्म घेतला. या वर्षातील बाल मृत्यूदर २२.२० आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. परंतु बालमृत्यू प्रकरणात शहरी भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे. जन्माला आल्यापासून वर्षभराच्या आतील बालकांचा मृत्यूदर मागच्या वर्षी कमी होता.
त्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ५२२, सन २०१४-१५ मध्ये ४८५, सन २०१५-१६ मध्ये ३२० बालकांचा मृत्यू झाला.सन २०१६-१७ मध्ये ३३८ तर सन २०१७-१८ मध्ये ३९१ बालकांचा मृत्यू झाला आहे.
शहरात ५८.३१ टक्के बालमृत्यू
जिल्ह्याच्या शहरी भागात सन २०१६-१७ मध्ये ५७.३९ टक्के तर सन २०१७-१८ मध्ये ५८.३१ टक्के नवजात व बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ५० टक्क्याच्या जवळील बालमृत्यू एस्फेक्सिया, सेप्सिस, निमोनिया व कमी वजनामुळे होतात. तर नवजात बालकांचा इतर आजारानेही मृत्यू होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: 391 children die in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.