वर्षभरात ३९७ शेततळ्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 01:30 AM2017-01-26T01:30:59+5:302017-01-26T01:30:59+5:30
सन २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना
१० पूर्णत्वाकडे : ४६० चे लक्ष्य, शेतकऱ्यांना ४.३० लाखांचे अनुदान
देवानंद शहारे ल्ल गोंदिया
सन २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली. या योजनेचे जिल्हाभरात ४६० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. वर्षभराच्या कालावधीत ३६३ शेततळ्यांना मंजुरी देऊन आखणी करून देण्यात आली. याशिवाय कार्यारंभाचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ १० शेततळे पूर्णत्वास गेले आहेत.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना दिला जातो. यात ३० बाय ३ मीटर कमाल क्षेत्रफळाची मर्यादा आहे. जिल्ह्याला दिलेल्या ४६० शेततळ्यांच्या उद्दिष्टासाठी एकूण ७६९ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ७६३ शेतकऱ्यांनी सेवाशुल्कही भरले. त्यात पात्र गावांतील ५६५ तर अपात्र गावांतील ६२ अर्ज होते. यापैकी शासकीय निकषानुसार ४९६ शेतकरी पात्र व ९२ शेतकरी अपात्र ठरले. तसेच ४६० शेतकऱ्यांची जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य तर ८४ शेतकऱ्यांची जागा अयोग्य ठरली. याशिवाय १२ शेतकऱ्यांची अजून जागा तपासणी झालेली नाही.
या प्रक्रियेत तालुकास्तरीय समितीने उद्दिष्टाला अनुसरून एकूण ३९७ अर्जांना मंजुरी दिली. २२ अर्ज समितीसमोर ठेवणे बाकी आहेत. त्यापैकी ३६३ शेततळ्यांची आखणी करून कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. सध्या १२ कामे सुरू असून १० पूर्ण झालेली आहेत. त्यातही नऊ शेततळ्यांना आतापर्यंत अनुदान देण्यात आले आहे.
नऊ शेततळ्यांना मिळाले अनुदान
४जिल्ह्यात आतापर्यंत १० शेततळे तयार करण्यात आले. यात सालेकसा तालुक्यात उद्दिष्टापेक्षा दोन अधिकच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. गोंदिया तालुक्यात उद्दिष्टापैकी दोन शेततळे तयार होणार नाहीत. नऊ शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील दोन शेततळ्यांच्या कामासाठी एक लाख रूपये, तिरोडा तालुक्यात पाच कामांसाठी २.३० लाख रूपये, देवरी तालुक्यात एका कामासाठी ५० हजार रूपये, आमगाव तालुक्यात एका कामासाठी ५० हजार रूपये अशा एकूण ९ शेततळ्यांसाठी ४.३० लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यात पूर्णत्वास गेलेल्या एका कामासाठी अनुदान उपलब्ध होणे बाकी आहे.
ंजिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामाची स्थिती
तालुका उद्दिष्ट मंजुरी काम पूर्ण
गोंदिया ५६ ५४ २
तिरोडा ९४ ९४ ५
गोरेगाव ६५ ४१ ०
अर्जुनी-मोर ० ० ०
देवरी १८९ १७५ १
आमगाव १४ १४ १
सालेकसा ३६ ११ १
सडक-अर्जुनी ६ ८ ०
एकूण ४६० ३७९ १०