कोरोनामुळे टळले अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील ४० विवाह सामुहिक विवाह सोहळे (संग्रहीत छाया)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:57+5:302021-05-11T04:30:57+5:30
गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू ...
गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्या मोठ्या समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन आपापल्या समाजांचे विवाह सोहळे सुरू केले होते. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळे आयोजकांनीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी कमीत कमी ४० सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात होते; परंतु कोरोनामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यांना टाळण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात मोठ-मोठे समाज असून या समाजातील बहुतांश लोक गरीब असल्याने गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच आपल्या मुला-मुलींचे लग्न करा, असे आवाहन करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी या ४० सामूहिक विवाह सोहळ्यातून एक हजार जोडपी विवाह बंधनात अडकतात. त्या एक हजार जोडप्यांच्या विवाहावर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होते. मागील दोन वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजनच करण्यात आले नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहून आयोजकांनी या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले नाही. त्यामुळे या दोन वर्षांत लोकांनी कोरोनामुळे अल्पखर्चात कुणाला न बोलविता मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे आटोपले आहेत. लग्नात होणाऱ्या अवाढव्य खर्च कोरोनानेही कमी केला; परंतु सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून मदत मिळते ती मदत मागच्या वर्षीपासून मिळू शकलेली नाही.
.........................
कन्यादान योजनेच्या निधीची मागणी नाहीच
सामूहिक विवाह सोहळ्यात जी जोडपी विवाह बंधनात अडकतात त्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनानतर्फे कन्यादान योजना म्हणून १० हजार रुपये देत असते. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळे होऊ शकले नाही. परिणामी सामूहिक विवाह सोहळ्यातील वधूला १० हजार रुपये कन्यादान म्हणून देण्यासाठी जो शासन अनुदान देते त्या अनुदानाची मागणी महिला व बालकल्याण विभागाने केलेली नाही.
.....
कोट
मागील पंधरा वर्षांपासून आमच्या सामूहिक विवाह सोहळा समिती साखरीटोलाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आम्ही सामूहिक विवाह सोहळा कोरोना संपेपर्यंत घ्यायचा नाही, हे ठरविले. आमचा समाज मोठा असून सामूहिक विवाह सोहळा आजघडीला आयोजित करणे म्हणजे आपल्याच समाजाचा नुकसान पोहोचविण्यासारखे आहे.
-भुमेश्वर मेंढे, संस्थापक अध्यक्ष, कुणबी सामूहिक विवाह साेहळा समिती साखरीटोला.