४० गावे होणार सुजलाम सुफलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:09 AM2019-02-13T01:09:42+5:302019-02-13T01:11:32+5:30

पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल.

40 villages will be in Sujlam Suflam | ४० गावे होणार सुजलाम सुफलाम

४० गावे होणार सुजलाम सुफलाम

googlenewsNext
ठळक मुद्देराजकुमार बडोले : ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राच्या कामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल.असे उद्गार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.११) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती गिरधारी हत्तीमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सरिता कापगते, शिला चव्हाण, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच मोहनलाल बोरकर, पं.स.सदस्य गीता टेंभरे, माजी सभापती कविता रंगारी, पदमा परतेकी, कोयलारीचे सरपंच फुलन धुर्वे, पुतळीचे सरपंच गीता कापगते, माजी सरपंच कमला वैद्य, उपसरपंच वच्छला मरस्कोल्हे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ओंकार बारापात्रे, मुख्य अभियंता सुखदेव शेरकर व देवरीचे कार्यकारी अभियंता सुहास धामणकर उपस्थित होते.
बडोले म्हणाले,शेंडा परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. या भागातील बहुतांश शेतकºयांकडे स्वत:च्या सिंचनाच्या सोई उपलब्ध आहेत. मात्र विद्युत दाब फारच कमी राहत असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. याचा फटका शेतकºयांना बसत होता. या परिसरातील जनतेच्या विद्युत विषयीच्या तक्रारी निवेदन व वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत होत्या. याची दखल घेवून या समस्येचे निराकरण करण्यासाठी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांच्या समस्या मांडल्या. यावर बावनकुळे यांनी या कामाला त्वरीत मंजुरी देवून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.त्याचेच फलीत म्हणून आज या गावात ३३ के.व्ही. चे विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. शेरकर यांनी प्रास्ताविकातून येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपकेंद्रतंर्गत शेंडा, सालईटोला व डोंगरगाव असे तीन फिडर निघणार असून प्रत्येक फिडरची लांबी १५ कि.मी. असेल. याचा लाभ परिसरातील ४० गावांना मिळणार असून कमी विद्युत दाबाच्या समस्येतून सुटका मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार अभियंता परिहार यांनी मानले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ अभियंता एच.के. टेंभुर्णीकर, लाईनमन पी.एच.गिºहेपुंजे, एच.एम.भगत, एस.एस.हनवते, आर.डी.कुंभरे, जी.के.सहकुरे, एन.पी. जयस्वाल, निशांत मांदाडे, चेतन राऊत, रणजीत पातोडे यांनी सहकार्य केले.

Web Title: 40 villages will be in Sujlam Suflam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.