कामबंद आंदोलनात ४०० डॉक्टरांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:03 PM2019-06-17T23:03:09+5:302019-06-17T23:03:21+5:30
कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.१७) कामबंद आंदोलन केले.यात आंदोलनात जिल्ह्यातील ४०० डॉक्टर सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्यां हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.१७) कामबंद आंदोलन केले.यात आंदोलनात जिल्ह्यातील ४०० डॉक्टर सहभागी झाले होते.
सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान रूग्णांना सेवा न देण्यासाठी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. इंडियन मेडिकल असोेशिएशनच्या नेतृत्वात गोंदियासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमगाव येथील डॉक्टरांनी ठाणेदाराला निवेदन दिले.जिल्ह्यातील सुमारे ४०० डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी गोंदियाच्या डॉक्टरांच्या संघटनेने पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन दिले होते.डॉ.निर्मला जयपुरीया, डॉ.राजेंद्र जैन, डॉ.नरेश मोहरकर, डॉ.संजय अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांनी निवेदन दिले. सोमवारला बंदला घेऊन आमगाव मेडीकल असोशिएन आमगावतर्फे ठाणेदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशांक डोये, उपाध्यक्ष डॉ. आशिष गुप्ता, सचिव डॉ.अभय बोरकर, सहसचिव डॉ. कमलेश मच्छीरके, डॉ.दिनेश बोपचे, डॉ.व्ही.वाळके, डॉ. बुलाखीदास कलंत्री, डॉ. अमित जायस्वाल, डॉ. एम.सोनी, डॉ. टी.डी.कटरे, डॉ. जितेंद्र वाळके, डॉ. ललीत कलंत्री,डॉ. आर. सोनी, डॉ. सादीत खान, डॉ.जे.गोहील, डॉ.व्ही. मेंढे, डॉ.तेजस्वीनी भुस्कुटे, डॉ.बी.वाळके, डॉ. एम.पटले, डॉ. बी. बोपचे, डॉ.एस. मेंढे, डॉ. एस. मुंजे, डॉ. हिरकने, डॉ.असमा शेख यांचा समावेश होता.