४ हजार कुटुंबे चार दिवसांपासून पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:05 PM2018-09-24T22:05:19+5:302018-09-24T22:05:44+5:30

आमगाव विधानसभा क्षेत्रातील ४ हजार कुटुंब मागील चार दिवसांपासून पाण्याविना आहेत. नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांनी पाण्याच्या बिलाचा भरणा केला तरीही त्यांना चार दिवसांपासून पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व विद्युत वितरण विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे ३२ गावातील ४० हजार नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

4000 families do not have water for four days | ४ हजार कुटुंबे चार दिवसांपासून पाण्याविना

४ हजार कुटुंबे चार दिवसांपासून पाण्याविना

Next
ठळक मुद्देअनागोंदी कारभार : आमदाराने घेतल्या अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव विधानसभा क्षेत्रातील ४ हजार कुटुंब मागील चार दिवसांपासून पाण्याविना आहेत. नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांनी पाण्याच्या बिलाचा भरणा केला तरीही त्यांना चार दिवसांपासून पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व विद्युत वितरण विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे ३२ गावातील ४० हजार नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
आमगाव विधानसभा क्षेत्रातील ४८ गावांसाठी तयार करण्यात आलेली बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वारंवार बंद पडत आहे. कधी विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे, तर कधी विद्युत व्यवस्थेत बिघाड आल्यामुळे तर कधी पाईप लाईन लिकेज झाल्यामुळे ही योजना अनेकदा बंद राहते. अनेक गावातील नळ कनेक्शन धारक बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे आजघडीला ३२ गावांसाठी ही योजना राबविली जाते.
आमगाव तालुक्यातील २८ तर सालेकसा तालुक्यातील चार गावांना या योजनेतून पाणी मिळत आहे. मागील चार दिवसांपूर्वी या नळ योजनेवर शुध्दीकरण यंत्र लावले. त्या शुध्दीकरण यंत्रांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. ११०० केव्ही विद्युतचा पुरवठा तेलीटोला येथील जलशुध्दीकेंद्रावर करण्यात आला. ११०० केव्ही लाईनचे मिटरपर्यंत कनेक्शन आणण्यात आले. परंतु मीटरपासून ३० मीटर अंतरावर ४४० केव्हीची लाईन ट्रान्सफार्मरपर्यंत नेण्यात आली. लाईन नेतांना विद्युत वितरण कंपनीने जमिनीत केबल खोदून ही लाईन नेली. परंतु चार दिवसांपूर्वी हे केबल डिसकनेक्ट झाल्यामुळे जल शुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा खंडीत झाला. परिणामी या ३२ गावांचा पाणी पुरवठा ठप्प आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी विद्युत विभागाच्या अधिकाºयांना पत्र देऊन सदर विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याची विनंती केली. परंतु ग्राहकाच्या मीटरपर्यंतच लाईट देणे आमचे काम आहे. एखाद्या ग्राहकाच्या मीटरपर्यंत लाईट आली म्हणजे आमचे काम संपले असे विद्युत विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. तर ११०० केव्ही विद्युतला ४४० केव्ही विद्युतमध्ये परावर्तीत करण्याचे काम विद्युत कंपनीचे आहे. असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. ‘ते’ काम आमचे नाही अशी भूमिका पाणी पुरवठा व विद्युत विभागाच्या अधिकाºयांनी घेतली आहे.
त्यामुळे दोन विभागाच्या वादात मात्र दोन हजार कुटुंबांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात पाणी पुरवठा समितचे संयोजक जगदीश शर्मा, भाजप कार्यकर्ते राजू पटले व सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब आ. संजय पुराम यांच्या निदर्शनास आणून दिली. पुराम यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाºयांच्या फोनवर कानपिचक्या घेऊन त्यांना काम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विद्युत कनेक्शन जोडण्याचे काम सुरू करण्यात आले.

दोन्ही बीडीओ आॅल इज वेल
बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी आमगाव व सालेकसा तालुक्यात जाते. आमगाव तालुक्यातील २८ गावात तर सालेकसा तालुक्यातील ४ गावात अश्या ३२ गावातील ४ हजार कुटुंबाना पाणी पुरवठा केला जातो. या योजनेला सुरळीत ठेवण्यासाठी खंडविकास अधिकाºयांनी तत्पर राहायला हवे. त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवकांना सूचना देऊन विद्युत बिलाची वसुली करा, नागरिकांना दररोज पाणी मिळेल, अशी काळजी घ्या असे सांगायला पाहिजे होते. परंतु दोन्ही तालुक्याचे खंडविकास अधिकारी या योजनेकडे सपशेल दुर्लक्ष करतात. ज्या लोकांना पाण्याची गरज आहे, ते लोक वारंवार बंद पडलेल्या योजनेतून पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करतात. ४० हजार लोक मागील चार दिवसांपासून पाण्याविना असून दोन्ही बीडीओ आॅल ईज वेल आहेत.

Web Title: 4000 families do not have water for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.