जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 02:03 AM2017-07-06T02:03:29+5:302017-07-06T02:03:29+5:30

दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले.

42 wells in the district dry | जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

Next

 ९६१ विहिरींचे काम पूर्ण : २ हजार पैकी १५२५ विहिरींचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत शेततळी तयार केल्या जात आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. परंतु त्या विहीरींनाही पाणी लागत नाही. जिल्ह्यात ९६१ विहीरींपैकी ४२ विहीरींना पाणी लागले नाही. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे.
राज्य सरकार द्वारे सिंचन विहीरी शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचन विहीरी देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यात २ हजार विहीरींचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते व १ हजार ५२५ विहीरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात २७५ पैकी २३९, गोंदियात २०० पैकी १६७, तिरोडा २७५ पैकी २३१, आमगाव १५० पैकी ११९, सडक-अर्जुनीत २५० पैकी १४५, देवरीत ३०० पैकी २००, अर्जुनी-मोरगाव ३०० पैकी २५४ व सालेकसात २५० पैकी १७० विहीरींचा समावेश आहे.
तर काम सुरू झालेल्या विहीरींची संख्या गोरेगाव २२४, गोंदिया १४०, तिरोडा १८१, आमगाव ३५, सडक-अर्जुनी ६१, देवरी ६२, अर्जुनी मोरगाव १६२ व सालेकसाच्या ५४ विहीरींना भरपूर पाणी लागले आहे. विहीरींमध्ये बोअरवेल बसविण्यात आलेल्या विहीरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहीरींवर बोअरवेल तयार करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहीरींचे काम अयशस्वी झाले.

१६ कोटी रुपये खर्च
सिंचन विहीरीसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. यातील १५ कोटी ७९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले. आता ६ कोटी ७० लाख १६ हजार रूपये पंचायत समित्यांकडे शिल्लक आहेत. गोरेगाव पंचायत समितीने ४ कोटी ५ लाखापैकी दोन कोटी ४४ लाख ३६ हजार, गोंदिया २ कोटी ९५ लाखापैकी १ कोटी ३९ लाख ९८ हजार, तिरोडा २ कोटी ५२ लाख ५० हजारापैकी २ कोटी ६ लाख ८७ हजार, आमगाव एक कोटी ६५ लाखापैकी ९२ लाख ७३ हजार, सडक-अर्जुनी २ कोटी १२ लाख ५० हजारापैकी एक कोटी ५७ लाख ६० हजार, देवरी दोन कोटी ८० लाखापैकी २ कोटी ५५ लाख २ हजार, अर्जुनी-मोरगाव ४ कोटी ३७ लाख ५० हजार पैकी ३ कोटी ६४ लाख ७८ हजार व सालेकसा तालुक्यात २ कोटी २ लाख ५० हजारापैकी एक कोटी १८ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.

 

Web Title: 42 wells in the district dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.