तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:17 PM2017-09-25T22:17:15+5:302017-09-25T22:17:50+5:30
पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे. गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथील ४२ विहिरी भर पावसाळ्यात कोड्या पडल्या आहेत. याच परिसरातील खोसेटोला व आडकुटोला या गावांची स्थिती देखील तुमसर सारखीच आहे. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथे खाजगी ३७ तर ५ शासकीय अशा ४२ विहिरी आहेत. यापैकी ४० विहिरी सप्टेंबर महिन्यातच पूर्णत: कोरड्या आहेत. एका विहिरीमध्ये १ फुट तर दुसºया विहिरीमध्ये दीड फुट पाणी आहे. २६ खासगी बोरअवेल असून त्या सर्व कोरड्या आहेत. ही स्थिती खोसेटोला व आडकुटोला येथील आहे. तेथील २६ खासगी व दोन शासकीय विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. परिणामी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सुरूवातीला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पाणी टंचाईची गावकºयांची ओरड वाढल्यानंतर गोरेगाव येथील तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी या गावांचा दौरा करुन अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.
या गावांमध्ये असलेल्या एक दोन पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, यासाठी प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने नागरिकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच मुकेश अग्रवाल यांनी केली आहे.
उन्हाळ्यात काय?
गोरेगाव तालुक्यातील तुमसर परिसरातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्या पडल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा शिल्लक आहे. आताच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती असणार अशी चिंता येथील गावकºयांना सतावू लागली आहे.
कमी पावसाचा परिणाम
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशये, तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जलाशयातील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात भूजल पातळी अवलंबून असते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळेच विहिरी कोरड्या पडल्याचे बोलल्या जाते.