४३ जोडप्यांचे लावले ‘शुभमंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:10 PM2018-03-31T22:10:51+5:302018-03-31T22:10:51+5:30
गोरेगाव तालुक्यातील ग्राम बघेडा (तेढा) येथील श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात ४३ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम बघेडा (तेढा) येथील श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात ४३ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले.
अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रामदास आंबेडकर होते. पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. संजय पुराम, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, जि.प.समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, को.आॅप. बँक संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.कृषी पशूसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, गोरेगाव कृऊबास सभापती योगराज पारधी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, जियालाल पंधरे, पी.जी.कटरे, हौसलाल रहांगडाले, रंजीत सरोजकर, सरपंच योगेश्वरी तुरकर, उपसरपंच सूरज सराटे, सरपंच रत्नकला भेंडारकर, गणेश तुरकर, परेश द्रुगवार, दिलीप चौधरी व मान्यवर उपस्थित होते.
१८ ते २५ मार्च दरम्यान आयोजित चैत्र नवरात्री उत्सवात विवाह समारंभाअगोदर माता मांडोदेवी देवस्थानात स्थापन केलेले ११५१ कलश (घट) विसर्जीत करण्यात आले. गेल्या २५ वर्षापासून सदर देवस्थानात घेण्यात येत असलेल्या सामुहिक विवाह सोहळ््यात यंदा ४३ जोडपी विवाहबद्ध झाली. उपस्थितांनी अक्षतांचा वर्षाव करुन जोडप्यांना आशिर्वाद दिला. माजी सरपंच नारायण बहेकार यांनी मंगलाष्टके गायीली.
याप्रसंगी आंबेडकर यांनी, सदर विवाह सोहळ्याची प्रशंसा करीत सध्याची परिस्थिती लक्षात घेता खर्चिक विवाह समारंभाला फाटा देणे आवश्यक झाले आहे. आपण पर्यटन मंत्र्यांच्या निधीतून लागेल तेवढा निधी सदर पर्यटन स्थळाला उपलब्ध करुन देवू असे ते म्हणाले. आ. पुराम यांनी, अधिक खर्च करुन कुटुंबियांची जेवढी प्रसंशा लोकांकडून होत नाही तेवढा दर्जा सामूहिक विवाह समारंभातून प्राप्त होत असतो. अशा समारंभात भाग घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पटले यांनी, शासनाने या देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असून येथे सर्वच सोयी शासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्या अशी विनंती आंबेडकर यांच्याकडे केली. याप्रसंगी माजी आ. रहांगडाले, माजी खा. बोपचे, जि.प.सभापती डोंगरे, सोनवाने, वालदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सामुहिक विवाह सोहळ््यात १० हजारांवर महिला व पुरुष उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडून संचालन समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी केले. आभार डॉ. लक्ष्मण भगत यांनी मानले. या विवाह सोहळ््यासाठी ज्योती कलश भवन समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सामूहिक विवाह समिती अध्यक्ष सिताराम अग्रवाल, मांडोदेवी देवस्थान समिती अध्यक्ष भैयालाल सिंदराम, सचिव विनोद अग्रवाल, सहसचिव कुशन घासले, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सखाराम सिंदराम, शालीकराम उईके, डॉ. जितेंद्र मेंढे, नंदकिशोर गौतम, गणपतलाल अग्रवाल, हुकुमचंद अग्रवाल, व्यवस्थापक प्रेमलाल धावडे, श्यामराव ब्राम्हणकर, शिवा सराटे, छन्नू काठेवार, योगराज धुर्वे, पेशन मडावी, महेंद्र मेश्राम, राधेश्याम उईके, तारेक कुबडे, सुंदर कापसे, किशोर शेंडे, तानसेन वालदे, रामदास ब्राम्हणकर यांच्यासह समितीच्या अन्य सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केले.