४३२ शाळाबाह्य मुलांचे जीवन फुलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:47 PM2017-09-09T23:47:31+5:302017-09-09T23:47:52+5:30
भीक मागून पोट भरणाºया, बाल मजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ४३२ बालक आढळले.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भीक मागून पोट भरणाºया, बाल मजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ४३२ बालक आढळले. त्या बालकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार मागील दीड वर्षात ६ ते १४ वर्ष वयोगटातील ५०१ बालके शाळाबाह्य असल्याचे लक्षात आले. यात २८७ मुले तर २१४ मुलींचा समावेश आहे. सन २०१५-१६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या सर्वेक्षणात ३५९ बालके शाळाबाह्य आढळले. यातील ३१३ बालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर ६-७ वर्षातील ४६ बालकांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षांत शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात १४२ बालके शाळाबाह्य आढळले. यात ६५ मुले व ५४ मुलींचा समावेश आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तर ५ बालकांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले.जिल्ह्यात कुडवा, रेल्वे स्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासनाकडून प्रत्येक बालकावर ३ हजार रुपये शिक्षण विभागाला देण्यात येत आहे.
ती रक्कम शिक्षण विभाग कुटूंबियांच्या खात्यात न टाकता पुस्तक, गणवेश यावर खर्च केली जात आहे.
दोन तालुक्यात एकही बालक नाही
सन २०१६-१७ मध्ये शिक्षकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सालेकसा व देवरी तालुक्यात एकही शाळाबाह्य बालक आढळले नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १, गोरेगाव ३, आमगाव १०, सडक-अर्जुनी १०, तिरोडा ११ व गोंदिया तालुक्यात १०७ बालके आढळले.
जिल्ह्यातून १५ केंद्र प्रमुखांची निवड करुन त्यांची बैठक घेण्यात आली. शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी केंद्रप्रमुख मदत करणार आहेत. यासाठी त्यांना १५ दिवसाचा वेळ दिला आहे.
-कुलदीपिका बोरकर
जिल्हा समन्वयक, पर्यायी शिक्षण, सर्वशिक्षा अभियान जिल्हा परिषद गोंदिया.