४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 09:38 PM2019-02-14T21:38:36+5:302019-02-14T21:38:54+5:30

पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.

44 lakh unemployed people are waiting for employment | ४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.
पूर्वी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा स्वंयरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी रांगेत लागावे लागत होते. मात्र आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल झाला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे झाले आहे. या केंद्रावर या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र यानंतरही मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी मोठ्या अपेक्षेने करतात. राज्यातील या ३५ केंद्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नाव नोदंणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ४४ लाख ५६ हजार ३६६ ऐवढी आहे. हा केवळ नोंदणीकृत आकडा असून राज्यात बेरोजगारांची संख्या अधिक असल्याचे बोलल्या जाते. या केंद्राच्या माध्यमातून कुठलाच रोजगार प्राप्त होणार नसल्याने येथे नोंदणी करण्याचा कुठलाच फायदा नाही असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हास्तरावर नोंदणी झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक बेरोजगारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे.
पुणे जिल्हा ३ लाख ७२ हजार ०७३, नागपूर २ लाख ३४ हजार ६०६, औरगांबाद २ लाख ३५ हजार २८८, ठाणे २ लाख ४४ हजार ९९१, मुंबई २ लाख १६ हजार ७०३, नाशिक २ लाख २६ हजार ८१०, मुंबई शहर १ लाख ९ हजार ८०८, जळगाव १ लाख ८३ हजार ४४३, अहमदनगर १ लाख ६८ हजार ५०८, नांदेड १ लाख ५ हजार ८५६, बीड १ लाख ९ हजार ८०८, लातूर १ लाख १४ हजार ९१६, सोलापूर १ लाख ७० हजार ५९५, सातारा १ लाख १९ हजार ६९८, कोल्हापूर १ लाख ८५ हजार ९०१, सांगली १ लाख ३३ हजार ९७९ बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे.
४९ हजार युवकांना रोजगाराचा दावा
कौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील आत्तापर्यंत ४९ हजार ७९६ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत १८ हजार ७७३ पदे भरण्यात आली आहे. वर्धा १५९, नागपुर ७८३, भंडारा ७, गडचिरोली १ व चंद्रपूर २३ तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही.

Web Title: 44 lakh unemployed people are waiting for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.