जिल्ह्यात तीन वर्षांत आढळले ४४७ एड्स रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:16 AM2017-12-01T00:16:35+5:302017-12-01T00:20:23+5:30

एड्स आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून व्यापक स्तरावर जनजागृती मोहिम राबविली जात आहे. मात्र यानंतरही एड्सच्या प्रसाराला पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात यश आलेले नाही.

447 AIDS sufferers found in the district in three years | जिल्ह्यात तीन वर्षांत आढळले ४४७ एड्स रुग्ण

जिल्ह्यात तीन वर्षांत आढळले ४४७ एड्स रुग्ण

Next
ठळक मुद्देबाधितांमध्ये ३१ गर्भवती महिलांचा समावेश : उपचारासाठी एआरटी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एड्स आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून व्यापक स्तरावर जनजागृती मोहिम राबविली जात आहे. मात्र यानंतरही एड्सच्या प्रसाराला पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात यश आलेले नाही. तीन वर्षांत जिल्ह्यात ४४७ एचआयव्ही बाधीत रुग्ण आढळल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात एड्स रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने यावर चिंता व्यक्त केली जात आहे. एड्स पूर्णपणे प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नसून एड्स मुक्त महाराष्टÑाचे स्वप्न अधुरेच आहे. मागील तीन वर्षांत ७५ हजार ७७९ लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यात ४४७ एचआयव्ही बाधीत रुग्ण आढळले. २०१५- १६ मध्ये २८ हजार ८६९ लोकांचे रक्ताचे नमुणे घेण्यात आले त्यात १८२ रुग्ण एचआयव्ही बाधीत आढळले. तर २०१६- १७ मध्ये २८ हजार ८८९ लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली, त्यात १६९ एचआयव्ही बाधीत व २०१७ आॅक्टोबरपर्यंत १८ हजार ४१ लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात ९६ एचआयव्ही बाधीत रुग्ण आढळले.
या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी उपचार केंद्रात औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एचआयव्ही बाधीत रूग्णांमध्ये ३१ गर्भवती महिलांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये २२ हजार ५३६ गर्भवती महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात १३ महिला एचआयव्ही बाधीत आढळल्या. २०१६-१७ मध्ये २२ हजार ४८७ गर्भवती महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात १४ महिला एचआयव्ही बाधीत आढळल्या. तर आॅक्टोबर २०१७ पर्यंत १३ हजार ६५१ गर्भवती महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात ४ एचआयव्ही बाधीत महिला आढळल्या.
२३ एड्स रुग्णांचा मृत्यू
मागील तीन वर्षांत जिल्ह्यात २३ एचआयव्ही बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला. २०१५ मध्ये १२,२०१६ मध्ये ५ आणि २०१७ मध्ये ६ एड्स बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे हे आकडे शासकीय असून वास्तविक आकडे अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एड्सची बाधा झाल्याचे रुग्णांना कळल्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी येत नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिली.
‘माझे आरोग्य, माझे अधिकार’हे नवे घोषवाक्य
दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी एड्स दिनासाठी माझे आरोग्य माझे अधिकारी हे घोषवाक्य आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. एड्स दिनानिमित्त राष्टÑीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: 447 AIDS sufferers found in the district in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.