गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:29 PM2017-11-14T23:29:14+5:302017-11-14T23:29:29+5:30

शहराचा सर्वांगिण विकास व नागरी सुविधांच्या पूर्ततेकरिता आराखडा तयार करून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

45 crores fund for Gondia municipal council | गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटींचा निधी

गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटींचा निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराचा सर्वांगिण विकास व नागरी सुविधांच्या पूर्ततेकरिता आराखडा तयार करून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शहरातील विविध विकास कामांसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला होकार दर्शवित गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटी रुपयांचा निधी त्वरीत मंजूर करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
गोंदिया शहर व लगतच्या परिसरात कोणतेही मोठे प्रकल्प किंवा उद्योग नाहीत. येथे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगपती पुढे येत नाही. त्याचा परिणाम नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. नगर परिषदचे स्वत:चे उत्पन्न अतिशय कमी असल्यामुळे नगर परिषद स्व:निधीतून कोणतेही शहर विकासाचे काम करू शकत नाही. शहर विकास व नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाचा निधी आवश्यक आहे.
त्यामुळे नगराध्यक्ष इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. दरम्यान विविध विकासकामांचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यात शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरु स्ती व देखभाल तसेच नवीन रस्ते बांधकामाकरिता २५ कोटी रुपयांची मागणी विशेष रस्ता अनुदान या योजनेतून केली. शहरात अस्तीत्वात असलेल्या उद्यांनांचे नुतनीकरण करणे,शहरातील मंजूर ले आऊटमधील मोकळ्या जागांमध्ये चिल्ड्रेन पार्क, जीम, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण अशा अनेक योजना विशेष अनुदान वैशिष्टयपूर्ण अनुदानातून १० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला.
शहरातील दलितवस्ती प्रभागांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी आणि वाचनालय, अभ्यासिका आदी प्रकल्प राबविण्याकरिता २०१७-१८ या आथिक वर्षात १० कोटी रु पये उपलब्ध करून देण्याची मागणी इंगळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्ताव गांभिर्याने समजून घेत संबंधित विभागांच्या प्रमुखांशी बोलून त्वरीत निधी मंजूर करण्याची सूचना केली. गोंदिया नगर परिषदेला विकासाकरिता निधी कमी पडू देणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे उपस्थित होते.

Web Title: 45 crores fund for Gondia municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.