कत्तलखाण्यात जाणाऱ्या ४५ जनावरांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:58 AM2018-10-10T00:58:30+5:302018-10-10T00:59:36+5:30
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचगड- कोरची टी पार्इंवरून कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांचे दोन ट्रक रविवारच्या रात्री ११.३० वाजता पकडण्यात आले. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचगड- कोरची टी पार्इंवरून कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांचे दोन ट्रक रविवारच्या रात्री ११.३० वाजता पकडण्यात आले. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ४९ लाख ५० हजार रुपये आहे. ट्रक क्र. टी.एस.०७ यु.एफ.३१८२ व ट्रक टी.एस.१२ युबी.६१३३ या दोन वाहनांत ४५ जनावरे डांबून वाहतूक करीत होते. या दोन ट्रकला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ७ आॅक्टोबरला पकडले. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत १३ लाख ५० हजार तर ट्रकची किंमत ३६ लाख रूपये सांगितली जाते. सदर प्रकरणात आरोपी मोहम्मद मुनावर अब्दुल वहाब (४०) रा. मुस्तापानगर जहानुमा जि.फलकनुमा तेलंगाणा, मुन्ना रेहान शेख (४०), रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर, हुसेन इस्माईल शेख (२०) रा. राजेंद्र वॉर्ड बल्लारशहा जि. चंद्रपूर, शैलेंद्र रामक्रिपाल किरईबाईर (२५) रा.ककोडी ता देवरी, पिंटू गायकवाड (३५) रा. गडचांदूर, निजाम हमीदखान रा. मुस्तफानगर राजेंद्रनगर जि.रंगारेडी तेलंगाणा, शेख मस्जीद शेख (२५) रा. संघमित्रा चौक राजेंद्र वॉर्ड बल्लारशहा जि. चंद्रपूर, इमरान बाबुमिया मोहम्मद रा. बिलाल नगरामनासुरा हैद्राबाद, बली चव्हाण रा. ककोडी, इमरान बाबू शेख गडचांदूर जि. चंद्रपूर या दहा जणांवर चिचगड पोलीस ठाण्यात प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ५ अ,१,७,९,अ महाराष्टÑ प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे, घनश्याम थेर, सोमेंद्रसिंह तुरकर, बिजेंद्र बिसेन, चेतन पटले, उमेश कांबळे, अजय बोपचे, पंकज रहांगडाले, सुलोचना मेश्राम, कैलाश कुरसुंगे यांनी केली.