१२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:34 AM2018-12-02T00:34:40+5:302018-12-02T00:35:01+5:30

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे.

45 kidnapping of children under 12 police station | १२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

१२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

Next
ठळक मुद्देचार पोलीस ठाणे शांत : मिळालेल्या बालकांना करणार पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत न मिळालेल्या ४५ बालकांचा शोध पोलीस घेणार आहेत. यात ६ मुले व ३९ मुली अशा एकूण ४५ बालकांच्या शोधासाठी ६ वे आॅपरेशन मुस्कान गोंदिया जिल्हा पोलीस राबवित आहेत.
मुलांकडून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.
१८ वर्षाखालील बेपत्ता व अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबवित आहे. या आॅपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाºया मुलांशी संपर्क केला जातो. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी राबविलेल्या पाच आॅपरेशनची फलश्रृती पाहता महाराष्टÑ शासनाने पुन्हा डिसेंबर महिनाभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया पोलीस दलाच्या अभिलेखावरील ४५ बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची चमू तयार झाली आहे.
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या ४५ बालकांत गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतील १२ बालके, गोंदिया ग्रामीण ३, रावणवाडी ३, दवनीवाडा १, आमगाव ३, सालेकसा १, देवरी ४, अर्जुनी-मोरगाव ४, केशोरी १, तिरोडा ३, गोरेगाव ९, रामनगर १ अश्या ४५ बालकांपैकी ३९ मुली व ६ मुलांचा समावेश आहे.
सामाजिक संघटना उदासीन
या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना यापूर्वी पुढे आलेल्या नाहीत.
त्यांचे जीवन फुलायला हवे
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पकडलेल्या अनेक बालकांचे जीवन आजही ‘जैसे थे’ आहे. आईवडील नसलेल्या बालकांना नागपूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात येते व त्यांची स्थिती या अभियानानंतरही जशीच्या तशीच राहते.

आॅपरेशन मुस्कानमध्ये काम करणारे पोलीस कर्मचारी स्वत:च्या अपहरण झालेल्या पाल्यांचा शोध घेण्यासाठी जेवढी मेहनत घेतील तेवढीच मेहनत सामान्य, गरीबांच्या मुला-मुलींना शोधण्यासाठी घेतील अशी अपेक्षा आहे.
हरिष बैजल
पोलीस अधीक्षक गोंदिया.

Web Title: 45 kidnapping of children under 12 police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.