४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:50 PM2019-07-02T21:50:11+5:302019-07-02T21:50:27+5:30

राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भागात ७० असे एकंदरीत ५५६ शहर स्तरीय स्वयं सहाय समूहाची निर्मिती करण्यात आली. यात ६२४९ महिला सहभागी झाल्या आहेत. यापैकी ४५० बचत गटांना ४५ लाख रूपयाचा फिरता निधी वाटप करण्यात आला.

45 lakh circulating funds to 450 saving groups | ४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी

४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी

Next
ठळक मुद्दे६२४९ महिलांचा सहभाग : शहरातील महिलांच्या बळकटीकरणासाठी दीनदयाल अंत्योदय योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भागात ७० असे एकंदरीत ५५६ शहर स्तरीय स्वयं सहाय समूहाची निर्मिती करण्यात आली. यात ६२४९ महिला सहभागी झाल्या आहेत. यापैकी ४५० बचत गटांना ४५ लाख रूपयाचा फिरता निधी वाटप करण्यात आला.
बचत गट बळकटीकरण व महिला सक्षमीकरणाकरिता तीन स्तरीय रचनेचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये स्वयं सहायता बचत गट ङ्क्त वसती स्तरीय संघ, शहर स्तरीय संघ याप्रमाणे बांधणी करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक स्वयं सहाय बचत गटातील दोन प्रतिनिधी या प्रमाणे १५ ते २० गटांचा वस्ती स्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. नगर परिषद गोंदिया व तिरोडा अंतर्गत ४४ वस्तीस्तर संघ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तीस्तरीय संघातून दोन प्रतिनिधी घेऊन शहर स्तरीय संघाची स्थापना करण्यात आली आहे. असे एकुण ३ शहर स्तरीय संघाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व उपजीविका वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत ४५० बचत गटांना प्रती गट १० हजार रु पये प्रमाणे एकुण ४५ लाखाचा फिरता निधी वाटप करण्यात आला आहे. नोंदणीकृत वसतीस्तरीय संघाला प्रति संघ ५० हजार याप्रमाणे ७ वसती स्तरीय संघांना ३ लाख ५० हजार वाटप करण्यात आलेले आहे. या निधीमधून गरजू बचत गटांना अडचणीच्या वेळेस तत्काळ कर्ज वाटप करण्यात येते.
सध्या स्थितीत आयसीआयसीआय बँक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ईतर राष्ट्रीयकृत बँकाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून बचत गट सभासद यांनी विविध प्रकारचे लघु गृह उद्योग व इतर व्यवसाय सुरू करून यांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे. वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत लोक संचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून ४२२ महिला बचत गटांना बँकेचे ५ कोटी १६ लाख रु पये कर्ज उपलब्ध करून दिल आहे. महिला बचत गटांद्वारे कर्जाची नियमति परतफेड केली जात आहे.

Web Title: 45 lakh circulating funds to 450 saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.