४५ लाखांच्या धान्याची अफरातफर
By admin | Published: September 17, 2016 02:08 AM2016-09-17T02:08:51+5:302016-09-17T02:08:51+5:30
गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून गोदाम किपरने ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या गहू व तांदळाची
गोरेगाव येथील प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल
गोंदिया : गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून गोदाम किपरने ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या गहू व तांदळाची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सविस्तर असे की, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदामातून प्राप्त जून व जुलै महिन्याचे टिपी व वाहतूक पासेस तपासले असता गोदाम किपरने कार्यालयात सादर केलेल्या टिपी पासेसची ई-१ रजिस्टरमध्ये व वाहतूक कंत्राटदाराने वाहतूक बिलासोबत कार्यालयात सादर केलेल्या १० खऱ्या वाहतूक पासेसमध्ये फरक आढळला. यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी फिर्यादी तहसीलदार कल्याण डहाट (३५,रा.गोरेगाव) यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तहसीलदार डहाट यांनी चौकशी केली असता शासकीय गोदामातील जुन,जुलै व आॅगस्ट ची आवक तपासली असता ई-१ रजिस्टरवरून वादग्रस्त १० टिपी पासेसची नोंद ई-१ तसेच ई रजिस्टरमध्ये आढळली नाही. यावरून चौकशी केलेल्या १० टिपीमधील १७ लाख १७ हजार ५७७ रूपयांचे ८३०.५५ क्विंटल गहू व २७ लाख ९० हजार ८९२ रूपयांचे ९५६.४४ क्विंटल तांदूळ असे एकूण ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या धान्याची अफरातफर केल्याचे उघडकीस आले.