झालुटोला सेवा सहकारी संस्थेत ४५ लाखांचा घोळ

By Admin | Published: June 22, 2016 01:37 AM2016-06-22T01:37:35+5:302016-06-22T01:37:35+5:30

गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सेवा संस्था झालुटोला (रजि.११११) आहे. या संस्थेचे सन २००९ ते २०१२ या कालावधीत असलेले अध्यक्ष

45 lakhs in Jhaluta Service Co-operative Society | झालुटोला सेवा सहकारी संस्थेत ४५ लाखांचा घोळ

झालुटोला सेवा सहकारी संस्थेत ४५ लाखांचा घोळ

googlenewsNext

कारवाईसाठी तक्रार : अध्यक्ष व गटसचिव यांचे संगनमत
परसवाडा : गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सेवा संस्था झालुटोला (रजि.११११) आहे. या संस्थेचे सन २००९ ते २०१२ या कालावधीत असलेले अध्यक्ष कुवरलाल हिरालाल बिसेन व गटसचिव डी.टी. डेडाऊ यांनी साठगाठ करून बोगस शेतकरी सभासद तयार करुन संस्थेत ४५ लाखांचा घोटाळा केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, झालुटोला, कारूटोला, खातीटोला या तीन गावांचे शेतकरी सभासद आहेत. जे शेतकरी सभासद असतात त्यांनाच पीक कर्ज देण्यात येते. पण या संस्थेत ४५ सभासद या तीन्ही गावांचे, परिसराचे व अस्तित्वात नाहीत. त्यांच्या नावाने बोगस सातबारा, आठ अ, ओळखपत्र, फोटो, बँकेतही खोटी स्वाक्षरी, कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्र बोगस तयार करून ४५ लाखांची उचल गटसचिव डी.डी. डेडाऊ, तत्कालीन अध्यक्ष कुवरलाल बिसेन व तत्कालीन शाखा व्यवस्थापक, सेवानिवृत झालेले निरीक्षक तिडके निरीक्षक व इतर लोकांनी मिळून केले आहे.
नवीन संचालक मंडळ यांनी सचिव हेडाऊ यांना सभेत, संस्थेवर एवढे थकीत कर्ज व कर्जदार शेतकऱ्यांची नावे सांगा, असे विचारण्यात आले. यावर त्यांची समजूत घालून कर्ज परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन करू, असे सांगितले. पण वास्तव बघितले असता सदर कर्जदार शेतकरीच गावाचे, परिसराचे, आजुबाजूचे, ओळख नसलेले व अस्तित्वातच नसलेले आढळले.
कुठले? कोण? काही पत्ता नाही. बापाचे व शेतकऱ्यांचे आडनाव वेगळे. स्वत:च्या मनाने आपल्या अधिकाराने नावे लिहून सर्वकाही सचिवाने केले. ऐवढा घोळ करूनही उंच मान करून सचिव फिरतो.
याबाबतची तक्रार वर्तमान संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रीतिचंद चौधरी, प्रकाश कावळे, विजय पिपरेवार, चोपराम कावळे, राजकुमार बिसेन, अरविंद रामटेके, सुरज बारेवार, पृथ्वीराज कटरे, जगदिश श्रीवास्तव, गणपत बिसेन, अर्चना ठाकरे, कांता बिसेन यांनी जिल्हा उपनिबंधक, आयुक्त यांना केली. पण घोटाळा होऊनही फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही.
गटसचिव डी.डी. हेडाऊ यांच्या मोबाईल (९७६५१५२०१३) क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी राँग नंबर सांगितले.
संस्थेचे सदस्य प्रकाश कावळे, विजय पिपरेवार यांनी सचिव यांना सर्व प्रकारची समजूत घातली. त्यांना ४५ लाख त्वरित भरून प्रकरण मिटवा, असे सांगितले. पण ते ऐकण्यास तयार नाही. तक्रार करण्यात आली, पण उपनिबंधक गोंदिया सहकार विभाग यांनीही आतापर्यंत कारवाई केली नाही. यात मोठ्या नेत्यांचा व चांगली मोठी मानसे, अधिकारी असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सातबारा तयार करणारा, ओळखपत्र, खाते उघडणारा, फोटो, स्वाक्षरी, पैसे घेणारा, काढणारा मुख्य सूत्रधार कोण? नियोजन करणारा मास्टर मार्इंड कोण? त्यांची संपूर्ण चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावातील शेतकरी व संचालक मंडळ यांनी निबंधक गोंदिया यांना केली आहे. (वार्ताहर)

Web Title: 45 lakhs in Jhaluta Service Co-operative Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.