महिन्याला ४५०० सीटीस्कॅन, शासनाच्या दरातच काम करा (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:37+5:302021-04-11T04:28:37+5:30

गोंदिया : कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर, ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह येणे आवश्यक असते. परंतु सीटीस्कॅनव्दारे हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) ...

4500 CT scans per month, work at government rate (dummy) | महिन्याला ४५०० सीटीस्कॅन, शासनाच्या दरातच काम करा (डमी)

महिन्याला ४५०० सीटीस्कॅन, शासनाच्या दरातच काम करा (डमी)

Next

गोंदिया : कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर, ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह येणे आवश्यक असते. परंतु सीटीस्कॅनव्दारे हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) करून कोरोनाचा उपचार करणे सुरू आहे. आधी गोंदिया जिल्ह्यात दिवसाला तीन- चार सीटीस्कॅन मोठ्या मुश्किलीने व्हायच्या त्या आता दिवसाला १५० च्या घरात होत आहेत. या सीटीस्कॅनकरिता शासनाने दर ठरवून दिलेले आहेत. पण काही ठिकाणी ठरावीक दरापेक्षा जास्त घेतले जात आहेत. तर काही ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरातच सीटीस्कॅन करण्यात येत असल्याचे पाहणीत पुढे आले आहे. कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसात किती आहे याचे निदान करून उपचाराच्या दृष्टीने एचआरसीटी महत्त्वपूर्ण ठरते.

.......

एचआरसीटीतील निदान

१ ते ८ स्कोर (सौम्य)-६२ टक्के

९ ते १८ स्कोर (मध्यम)-२० टक्के

१९ ते २५ स्कोर (गंभीर)- १० टक्के

शून्य स्कोर (नॉर्मल)-८ टक्के

......

९८ टक्के वाढल्या सीटीस्कॅन

कोरोनाच्या पूर्वी गोंदियात दिवसाला तीन ते चार सीटीस्कॅन व्हायच्या. परंतु आजघडीला १५० च्या घरात दररोज सीटीस्कॅन होत असतात. महिन्याकाठी ४ हजार ५०० सीटीस्कॅन विविध केंद्रांवर सीटीस्कॅन होत आहेत. खासगी केंद्रांवरील सीटीस्कॅन मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

.......

शासनाने निश्चित केलेले दर

-१६ स्लाईसखालील सीटीस्कॅन २००० रुपये

-१६ ते ६४ स्लाईसखालील सीटीस्कॅन २५०० रुपये

-६४ पेक्षा अधिक स्लाईस सीटीस्कॅन ३००० रुपये

.........

कोट

शासनाने ठरवून दिलेल्या दरातच आम्ही सीटीस्कॅन करतो. पण ते आम्हाला परवडण्यासारखे नाही. परंतु संकटाच्या काळात मदत करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमातच आम्ही काम करीत आहोत. संकटात सापडलेल्यांना मदत करणे हेच ध्येय पुढे ठेवले आहे.

-डॉ. घनश्याम तुरकर, रेडिओलॉजिस्ट गोंदिया.

........

काही ठिकाणी शासनाच्या दराने पैसे घेतले जातात तर काही ठिकाणी अधिक पैसे घेतले जातात. कोविड केअर सेंटरमध्ये खासगी सीटीस्कॅन मशीन आहेत त्यांच्याकडून अधिक पैसे उकळले जातात. परंतु आमचा रुग्ण अडकला असल्याने आम्ही बोलू शकत नाही.

-हिरालाल रहांगडाले, रुग्णाचा नातेवाईक

...........

सीटीस्कॅन केल्याशिवाय कोरोनाचा उपचार केला जात नाही. त्यासाठी सीटीस्कॅनचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. शासनाच्या दराच्या अधीन राहूनच सीटीस्कॅनचे पैसे घ्यायला हवे. संकटात सापडलेल्यांना धीर द्यावा.

राजेश मडावी, रुग्णाचा नातेवाईक.

Web Title: 4500 CT scans per month, work at government rate (dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.