४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Published: October 10, 2015 02:16 AM2015-10-10T02:16:56+5:302015-10-10T02:16:56+5:30

चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय ...

46 thousand women have the ability to move | ४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

Next

बचत गटांचा आधार : पदरमोड करून जमविले ८ कोटी ५८ लाख
गोंदिया : चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय थाटत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींचे हे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटित करुन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमंचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना- ३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक- ११०, स्वयंसिद्धा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान - २११३ असे एकूण ३८८४ महिलांचे बचत गट माविमंकडून कार्यरत आहेत.
उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामूहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कुटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय बचत गटातील महिला करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

महिलांनी केली आठ कोटींची बचत
महिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी-मोरगाव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावांमध्ये ३८८४ महिला बचत गटांची स्थापना केली. या माध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटित करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-वयवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचत गटांना उपलब्ध करून दिले आहेत. उद्योग व्यवसाय करण्यास बचत गट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन बँकांनी दाखविला आहे.

गटांना घेतले ४२.७५ कोटींचे कर्ज
उद्योग-व्यवसायासाठी आतापर्यंत ३१६० बचत गटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माविमंच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत आहे. या तालुक्यातील ११३९ बचत गटांना प्रतिबचत गट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ७५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे.
जिल्ह्यातील ५७१ महिला बचत गटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षात सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोेसे यांनी दिली.

Web Title: 46 thousand women have the ability to move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.